हाडं खिळखिळी करणारी गोलंदाजी, केवळ 62 चेंडूंपर्यंतच सामना रंगला, घातक खेळपट्टीची कहाणी

| Updated on: Jan 30, 2021 | 1:42 PM

हा सामना वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला होता.

हाडं खिळखिळी करणारी गोलंदाजी, केवळ 62 चेंडूंपर्यंतच सामना रंगला, घातक खेळपट्टीची कहाणी
Follow us on

जमैका : कसोटी सामना 5 (Test Match) दिवस खेळला जातो. पावसाच्या व्यत्ययामुळे, खेळपट्टी ओली आणि निसरडी असल्याने अनेकदा कसोटी सामना रद्द करण्यात येतो. मात्र कधी खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळी घेत असल्याने सामना रद्द केल्याचं कधी ऐकलं आहे का? कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 23 वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. ज्यामुळे 10 ओव्हरनंतर आणि तासाभराच्या खेळानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेला  23 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आपण या घातक खेळपट्टीची कहाणी  सविस्तर जाणून घेणार आहोत. (today in history 29 january 1998 england vs west indies jamaica shortest test match in history)

हा सामना 29 जानेवारी 1998 ला जमैकामध्ये वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England jamaica test) यांच्यात खेळण्यात येत होता. इंग्लंडचा कर्णधार माईक अर्थटनने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी अर्थटन आणि एलक स्टीवर्ट ही सलामी जोडी मैदानात आली. इथून सर्व प्रकार सुरु झाला. गोलंदाजीसाठी वेस्टइंडिजचे गोलंदाज सज्ज होते. सामन्याला सुरुवात झाली. गोलंदाजांनी टाकलेले चेंडू बॅटवर येणं अपेक्षित असतं. मात्र या खेळपट्टीवर चेंडू विचित्रप्रकारे उसळत होता. या उसळीमुळे कोणता चेंडू कोणत्या दिशेने येणार, याचा किंचीत अंदाजही फलंदाजांनाही बांधता येत नव्हता. यामुळे वेस्टइंडिजच्या गोलंदाजांनी फेकलेल्या चेंडूंचा सामना इंग्लंडच्या फंलदाजांना बॅटऐवजी शरीराद्वारे करावा लागत होता.

चेंडू थेट फलंदाजांच्या अंगावर येऊन थांबत होते. फलंदाजानां शरीरावर विविध भागावर चेंडूचे जोरदार फटके बसत होते. खेळपट्टीत उसळी असल्याने चेंडू बाऊन्स होत होता. यामुळे इंग्लंडच्या फलंदाजाना या आक्रमक चेंडूचा सामना करावा लागत होता. हा प्रकार असाच सुरु होता. फंलदाज एकामागोमाग एक दुखापतग्रस्त होण्याच्या भितीने बाद होत होते. काही खेळाडू हे रक्तबंबाळ झाले. इंग्लंडचे फिजीयो (वैद्यकीय पथक) किमान 10-12 वेळा फंलदाजांना दुखापत झाली नाही ना, हे पाहण्यासाठी मैदानात आले.

 

गोलंदाजांना टाकलेला चेंडू थेट फलंदाजाच्या अंगावर येऊन आदळत होता. यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापत झालेली होती. फक्त 62 चेंडूंचाच खेळ झाला होता. इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 17 धावा केल्या. हा सारा प्रकार पाहून फिल्ड अंपायर्सच्या जोडीने मध्यस्थी केली. फिल्ड अंपायर असलेल्या स्‍टीव बकनर आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी लक्ष घातलं. आपसात चर्चा केली. यानंतर हा सामना रद्द करण्याचा साहसी निर्णय या दोघांनी घेतला. अशा प्रकारे हा सामना रद्द करावा लागला होता.

संबंधित बातम्या :

बॉल लागले, हेल्मेट फुटलं, खाली कोसळला, पण बॅटिंग सोडली नाही, पुजाराच्या बॅटिंगवर ‘बापमाणूस’ खूश!

(today in history 29 january 1998 england vs west indies jamaica shortest test match in history)