Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताच्या अदिती अशोकचं रौप्यपदक थोडक्यात हुकलं

टोक्यो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी गोल्फमधये भारताचं पदक थोडक्यात हुकलं. भारताच्या अदिती अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताच्या अदिती अशोकचं रौप्यपदक थोडक्यात हुकलं
आदिती अशोक
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 10:44 AM

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी गोल्फमध्ये भारताचं पदक थोडक्यात हुकलं. भारताच्या अदिती अशोकला (Aditi Ashok) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताची युवा गोल्फर आदिती अशोकला ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात अपयश आलंय.

अदिती अशोकचं रौप्यपदक थोडक्यात हुकलं

महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळात तिने चौथे स्थान मिळवलं. शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या क्रमांकावर होती. अदिती आज चौथ्या फेरीत टॉप -4 मध्ये राहिली. अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्णपदक पटकावले. आता रौप्य आणि कांस्यपदकांसाठी जपानच्या मोनी इनामी आणि न्यूझीलंडच्या लेडिया को यांच्यात सामना होईल.

पदक जिंकली नाही पण देशाला गोल्फची ओळख करुन दिली!

भारताची महिला गोल्फर अदिती अशोक हिने उत्तम कामगिरी केली. तिने भारतासाठी गोल्फमध्ये पदक जिंकले नाही, परंतु या खेळाला देशात नवी ओळख देण्याचे काम केले आहे. अदिती जगातील 200 व्या क्रमांकाची गोल्फर आहे. पण तिच्या अप्रतिम खेळामुळे तिने सध्याच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन अमेरिकन नेली कोरडा आणि माजी जागतिक नंबर वन लिडिया को (लिडिया को) यांना कडवी झुंज दिली आहे. 23 वर्षीय अदिती केवळ एका फटक्याने पदक जिंकण्यात चुकली.

रिओ ऑलम्पिकमधून धडा घेतला, टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘लढली…भिडली!’

भारतीय गोल्फर अदिती अशोकची ही केवळ दुसरी ऑलिम्पिक होती. तिने 2016 च्या रिओमध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले. पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये ती पदकापासून वंचित राहिली होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तिने तिच्या कामगिरीने बरीच प्रसिद्धी मिळवली पण नंतर ती गती कायम राखू शकली नाही आणि तिने 41 व्या क्रमांकावर रिओमधील आपला प्रवास संपवला. पण टोकियोमध्ये तिने रिओच्या चुकांमधून धडा घेतला आणि चौथ्या क्रमांकावर राहून आपला टोकियो ऑलिम्पिकमधला प्रवास संपवला.

एका शॉटने पदक हुकलं…..!

भारतीय गोल्फर अदिती अशोकने गोल्फ स्पर्धेत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. तिने सामन्यावर आपली पकड सातत्याने ठेवली आणि पहिल्या 3 मध्ये स्थान राखले. खेळाच्या तिसऱ्या फेरीच्या समाप्तीनंतर, ती अमेरिकन गोल्फर नेली कोरडा नंतर दुसऱ्या क्रमांकावर होती, म्हणजेच रौप्य पदकाची प्रबळ दावेदार होती. यानंतर, शनिवारी खेळलेल्या चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ती शेवटपर्यंत पदकाची दावेदार राहिली. पण सामन्यातील शेवटच्या शॉटवर झालेल्या चुकीमुळे पदक जिंकण्याची संधी तिच्या हातातून निसटली.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.