ENG vs AUS : ओल्या मैदानामुळे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या टॉसला उशीर
एमसीजी मैदान सद्या यंत्रांच्या साहाय्याने सुखवण्याचं काम सुरु आहे.
पार्थ : ऑस्ट्रेलियात (Australia) मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला तिथं मॅच खेळवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आतापर्यंत अनेक मॅचेस पावसामुळे उशिरा सुरु झाल्या आहेत. आजची मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) या दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीम आज प्रयत्न करतील. दोन्ही टीममध्ये गुणवंत खेळाडू आहेत.
आजची मॅच एमसीजीच्या मैदानात होणार आहे. परंतु तिथं सकाळपासून अधिक पाऊस झाल्यामुळे अद्याप अंपायरने टॉस पाडलेला नाही. काहीवेळाने मैदानाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर तिथं मॅच होणार की, नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल.
एमसीजी मैदान सद्या यंत्रांच्या साहाय्याने सुखवण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे तिथं मॅच सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीनवेळा सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंड टीम दोनवेळा विजयी ठरली आहे. तर ऑस्ट्रेलिया टीम एकवेळी विजयी झाली आहे.
इंग्लंड टीम
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .
ऑस्ट्रेलियन टीम
अॅरॉन फिंच, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .