Kavya Maran : IPL 2025 मध्ये काव्या मारन चुकली का?, नुकसानीचा सौदा, 39.25 कोटी रुपये बुडाल्यात जमा!

| Updated on: Apr 07, 2025 | 8:52 AM

Kavya Maran : IPL मध्ये कुठला सौदा फायद्याचा ठरेल? कुठला निर्णय फायद्याचा, कुठला तोट्याचा? हे सांगता येत नाही. सध्या सनरायजर्स हैदराबाद टीमची मालकीण काव्या मारन निर्णय घेताना चुकल्याच दिसत आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून, तब्बल 39.25 कोटीच्या घरात ही रक्कम जाते.

Kavya Maran : IPL 2025 मध्ये काव्या मारन चुकली का?, नुकसानीचा सौदा, 39.25 कोटी रुपये बुडाल्यात जमा!
SRH Owner Kavya Maran
Image Credit source: Getty Images
Follow us on

IPL मध्ये प्रत्येक फ्रेंजायजी मालकाचा प्रयत्न असतो की, ते जे पैसे खर्च करतायत, त्यावर त्यांना बंपर रिर्टन मिळावा, टीमला फायदा झाला पाहिजे. पण यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमची मालकीण काव्या मारन तिच्या निर्णयात चुकल्याच दिसतय. काव्या मारनने मोठ्या अपेक्षेने भरपूर पैसा खर्च केला. पण त्यावर तिला आता नुकसान सहन करावं लागतय. ही रक्कम थोडीथोडकी नसून, तब्बल 39.25 कोटीच्या घरात ही रक्कम जाते. SRH ची मालकीण काव्याने ज्या तीन खेळाडूंवर 39.25 कोटी रुपये खर्च केलाय, ते अपेक्षेनुसार रिर्टन देत नाहीयत. संघाला अपेक्षित असलेलं प्रदर्शन करण्यात ते कमी पडतायत.

मागच्या आयपीएल सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबादची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये त्यांचा पराभव झालेला. आपल्या प्रदर्शनाने या टीमने क्रिकेटप्रेमींच मन जिंकलं होतं. प्रतिस्पर्धी टीमच्या मनात धाक, भिती निर्माण केली होती. नव्या सीजनमध्ये या टीमकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा होती. पण सीजनमधला पहिला सामना सोडल्यास अन्य सामन्यात सनरायजर्सच्या टीमने निराशाजनक प्रदर्शन केलय. अपयशाच एक मोठ कारण टॉप ऑर्डरच फेल होणं आहे. प्रतिष्ठा आणि अपेक्षेनुसार त्यांनी प्रदर्शन केलेलं नाही.

तिघांकडून जास्त निराशा

यात तीन खेळाडू विशेष करुन निराश करत आहेत. त्यांच्यावर काव्या मारनने भरपूर पैसा खर्च केला आहे. या तीन जणांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड आहे. त्यानंतर युवा भारतीय ओपनर अभिषेक शर्मा आणि विकेटकीपर फलंदाज ईशान किशन आहे. मागच्या सीजनमधील प्रदर्शन लक्षात घेऊन हेड आणि अभिषेकला 28 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. दोघांसाठी काव्या मारनने प्रत्येकी 14-14 कोटी रुपये मोजले. मेगा ऑक्शनमध्ये ईशान किशनसाठी 11.25 कोटी रुपये खर्च केला. आधी ईशान किशन मुंबई इंडियन्सकडून खेळायचा.

असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक

सीजनमधला पहिला सामना सोडल्यास ईशान किशन अन्य तीन सामन्यात अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात हैदराबादने 286 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. यात ईशान किशनची स्फोटक 106 धावांची खेळी होती. तेच हेडने 67 रन्स केले होते. अभिषेकने सुद्धा वेगवान 24 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या चार सामन्यात हे तिन्ही फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. हेडने चार सामन्यात 81 धावा केल्या आहेत. अभिषेक आणि ईशानची अवस्था यापेक्षा खराब आहे. अभिषेकने 3 इनिंगमध्ये 27 आणि ईशानने फक्त 21 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत काव्या मारनचा 39.25 कोटी रुपये गुंतवणूकीचा निर्णय चुकला तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. आयपीएलमध्ये SRH टीमचा संघर्ष सुरु आहे.