IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये बदल
आज दुसऱ्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा (Australia) विरुद्ध पहिला सामना झाल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियात आज होणाऱ्या मॅचसाठी काही बदल करण्यात आला आहे. कारण फलंदाजांनी (Batsman) आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली होती. परंतु गोलंदाजांच्या वारंवार खराब कामगिरीमुळे टीम इंडिया पराभूत झाली आहे.
आज दुसऱ्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केल्याची माहिती मिळाली आहे. जसप्रिम बुमराह याला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही सामन्यात गोलंदाजांमुळे टीम इंडिया हारली आहे.
समजा आजच्या सामन्यात जसप्रित बुमराहला संधी दिली तर भुवनेश्वर कुमार बसवलं जाऊ शकतं. तसेच उमेश यादवच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. मागच्या काही सामन्यात उमेश यादवकडून चांगली गोलंदाजी झालेली नाही.
पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती.
आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण पहिल्या सामन्यात दोघेही पटकन बाद झाले होते.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल