U19 World Cup : भारताची ‘यशस्वी’ कामगिरी, पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत धडक
यशस्वीच्या शतकी आणि दिव्यांशच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील विजेत्याशी होणार (India vs Pakistan)आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक (U19 World Cup) मारली आहे. भारताने उपांत्य फेरीत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 10 गडी राखत विजय मिळवला आहे. अंतिम फेरीसाठी पाकिस्तानने टीम इंडियाला 173 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जैसवाल याने 113 चेंडूत 105 धावा केल्या. तर दिव्यांश सक्सेना याने 99 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यशस्वीच्या शतकी आणि दिव्यांशच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील विजेत्याशी होणार (India vs Pakistan)आहे.
अंडर 19 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 43.1 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या. त्यामुळे भारताला 173 धावांचं आव्हान मिळालं. पाकिस्तानने दिलेलं हे आव्हान भारताने अवघ्या 35.2 षटकात नाबाद पूर्ण केलं.
Yashasvi Jaiswal and Divyaansh Saxena’s average opening partnership during the 2020 #U19CWC is 196 ?
They just love batting together ? #FutureStars pic.twitter.com/J652o3wgY2
— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020
भारताकडून सलामीसाठी उतरलेल्या दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात (India vs Pakistan) केली. सुरुवातीला पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अंदाज घेतला. त्यानंतर खेळपट्टीवर जम बसल्यावर दोघांनीही पाकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. टीम इंडियाकडून सलामीसाठी उतरलेल्या यशस्वी जैसवालने 113 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. तर दिव्यांश सक्सेनाने 99 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे पाकच्या एकाही गोलंदाजाला शेवटपर्यंत सलामी जोडी फोडता आली (U19 World Cup) नाही.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्ताला भारतीय गोलंदाजांनी सळो की पळो करुन सोडलं. सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांचा अपवाद वगळता पाकच्या सर्वच फलंदाज 10 किंवा त्याहूनही कमी धावा करत बाद झाले. पाकिस्तानकडून सलामीसाठी उतरलेल्या मोहम्मद हुरायरा अवघ्या 4 धावा करत माघारी परतला. तर फआद मुनीरही शून्यावर बाद झाला.
The moment India secured a special victory over Pakistan ? #U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/23UT5e7FVI
— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020
यानंतर सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव (India vs Pakistan) सावरला. हैदरने 77 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. तर रोहिलने 102 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. मात्र कर्णधार प्रियम गर्गने ही जोडी फोडत हैदर अलीला आऊट केलं.
हैदर अली तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला पुन्हा गळती लागली. भारताकडून सुशांत मिश्रा 3, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 तर अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 1 विकेट (U19 World Cup) घेतली.