What a shot… 109 मीटरचा सिक्स! बॉल थेट…. या भाऊची बॅटींग बघून सगळेच शॉक झाले
109 मीटरचा लाँग सिक्स मारला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली : What a shot… हा शद्ब क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये ऐकायला मिळतोय. T20 World Cup 2022 च्या यूएई विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एका खेळाडूची बॅटींग पाहून स्टेडियम उपस्थित असलेल्या क्रिकटे प्रेमींच्या तोंडूनही What a shot…हा एकच शब्द ऐकायला मिळाला. एका खेळाडूने तब्बल 109 मीटरचा लाँग सिक्स मारला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात UAE संघाचा श्रीलंकेकडून पराभव झाला आहे. या सामन्यात UAE ची कामगिरी काही खास झाली पण त्यांच्या एका खेळाडूने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. त्याच्या दमदार शॉटने सगळ्यांनाच अचंबित केले आहे.
UAE चा बॅट्समन जुनैद सिद्दीकीने इतका लांबलचक षटकार मारला की लोक बघतच राहिले. बॉल वाऱ्याच्या वेगाने थेट स्टेडियम बाहरे गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा याने बॉलींग केली. जुनैदने बॅट अशी फिरवली की बॉल 109 मीटर लांब गेला. त्याच्या या सिक्सरेने सगळेच शॉक झाले.
या मॅचमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आठ गडी गमावून 152 धावांचा डोंगर श्रीलंकेच्या टीमने उभा केला. मात्र, हे टार्गेट UAEच्या टीमला पेलवले नाही.
View this post on Instagram
यूएईचा संघ 100 धावांचा पल्लाही गाठू शकला नाही. 17.1 षटकात 73 धावांवर सगळे ऑलआऊट झाले. श्रीलंकेने 79 धावांनी सामना जिंकला आहे.