IND vs AUS 3rd Test | उमेश यादवचं शतक! भारतात अशी कामगिरी करणार 13 वा खेळाडू
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती एकदम नाजूक आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलिया जिंकेल अशी स्थिती आहे. कारण भारताने विजयासाठी अवघ्या 75 धावांचं आव्हान दिलं आहे.
मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं जबरदस्त कमबॅक करत भारताला दणका दिला आहे. पहिल्या डावात 109 धावांवर भारताला रोखलं आणि 88 धावांची आघाडी घेतली. लीडमुळे दुसऱ्या डावात भारताची स्थिती अशी करून ठेवली की 100 धावाही विजयासाठी देता आल्या नाहीत. अवघ्या 75 धावा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत 142 चेंडूत 59 धावांची खेळी केली. मात्र असं असताना वेगवान गोलंदाज उमेश यादवनं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात 100 गडी बाद करण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारा उमेश यादव 13 वा गोलंदाज आहे. तिसऱ्या कसोटीत 3 गडी बाद करत भारतात 100 गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
उमेश यादवला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळाली आहे. उमेशला संधी मिळताच पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियाचे 3 गडी बाद केले. उमेशनं फक्त 5 षटकं टाकत 12 धावा देऊन 3 गडी टिपले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल स्टार्कला त्रिफळाचीत करत उमेशने भारतात 100 गडी बाद केले आहेत. यासह उमेश यादव माजी क्रिकेटपटू कपिल देव, जवागल श्रीनाथ, जाहीर खान आणि इशांत शर्मा यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. भारतात सर्वाधिक 219 विकेट घेत कपिल देव आघाडीवर आहे.
भारतात कसोटीत 100 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
- कपिल देव- 219 विकेट्स
- जवागल श्रीनाथ- 108 विकेट्स
- जहीर खान- 104 विकेट्स
- इशांत शर्मा- 104 विकेट्स
- उमेश यादव-101 विकेट्स
भारतात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
- अनिल कुंबळे – 350 विकेट्स
- रविचंद्रन अश्विन- 329 विकेट्स
- हरभजन सिंग – 265 विकेट्स
- कपिल देव – 219 विकेट्स
- रविंद्र जडेजा – 193 विकेट्स
- भागवथ चंद्रशेखर- 142 विकेट्स
- बिशनसिंह बेदी- 137 विकेट्स
- जवागल श्रीनाथ- 108 विकेट्स
- जहीर खान- 104 विकेट्स
- इशांत शर्मा- 104 विकेट्स
- विनू मनकड – 103 विकेट्स
- प्रग्यान ओझा- 101 विकेट्स
- उमेश यादव- 101 विकेट्स
भारताने तिसऱ्या डावात अवघ्या 75 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला दिलं आहे. हा सामना गमवल्यानंतर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण होणार आहे. त्यामुळे आता चौथा कसोटी सामना भारतासाठी करो या मरो असाच ठरणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन.