IPL 2022 Purple cap : उमेश यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल, इशान किशनने गमावली ऑरेंज कॅपची संधी
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) पाच गडी राखून पराभव केला. सध्या सुरू असलेल्या मोसमात कोलकाता नाईट राईडर्सने तिसरा विजय मिळवला.
मुंबई – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) पाच गडी राखून पराभव केला. सध्या सुरू असलेल्या मोसमात कोलकाता नाईट राईडर्सने तिसरा विजय मिळवला. टेल-एंडरने अवघ्या 14 चेंडूत 50 धावा केल्या, अशा प्रकारे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या केएल राहुलची बरोबरी केली. राहुलने 2018 च्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. डॅनियल सॅम्सने टाकलेल्या 16 व्या षटकात अम्मीन्सने 35 धावा लुटल्या. त्यामुळे KKR ने 162 धावांचे आव्हान चार षटके बाकी असताना पूर्ण केले.
CRED Power Player of the Match between @KKRiders and @mipaltan is Umesh Yadav. #TATAIPL @CRED_club #CREDPowerPlay #KKRvMI pic.twitter.com/eFeGLvE1jk
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
राजस्थान रॉयल्स तीन सामन्यांतून दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर
या विजयासह KKR चार सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सध्याच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत हैदराबादच्या वरच्या बाजूला आहे. बुधवारपर्यंत अव्वल स्थानावर असलेले राजस्थान रॉयल्स तीन सामन्यांतून दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सला अजून हवा तसा सूर गवसलेला नाही
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत इशान किशनला अंतर गाठण्याची काल चांगली संधी होती. परंतु काल मिळालेली आयती संधी त्याने घालवली. काल त्याने सलामीला बॅटींग करताना 21 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला अजून हवा तसा सूर गवसलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते देखील नाराज आहेत.
उमेश यादवने आपला अव्वल दर्जाचा फॉर्म कायम
उमेश यादवने आपला अव्वल दर्जाचा फॉर्म कायम ठेवला आहे. त्यामुळे तो पर्पल कॅपच्या शर्यतीत तो अजूनही अव्वल स्थानावर आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत चार सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत.