Union Budget 2021 | बजेटदरम्यान टीम इंडियाच्या विजयाचा उल्लेख, निर्मला सीातारमण म्हणाल्या….
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान टीम इंडियाचं कौतुक केलं.
नवी दिल्ली : “क्रिकेटप्रेमी देशात मी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक (Border Gavaslar Trophy 2020-21) विजयाचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. हा शानदार विजय आपल्याला एक युवा म्हणून अंतर्भूत शक्तीची आठवण करून देतो. या मालिकेत नवख्या खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. युवा खेळाडूंनी पुढे सरसावत चांगली कामगिरी केली तसेच भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं”, अशा शब्दात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं. अर्थमंत्री सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला. यावेळेस त्यांनी टीम इंडियाच्या या कामगिरीचा उल्लेख केला. (Union Budget 2021 finance minister nirmala Sitharaman lauds Team India during budget speech)
सीतारमण काय म्हणाल्या?
अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाची तुलना टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयाशी केली. “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. टीम इंडियाच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेप्रमाणेच या अर्थसंकल्पाचे चांगले परिणाम दिसतील. पहिल्या कसोटीत पराभवानंतर भारत पिछाडीवर होता. मात्र यानंतर जोरदार मुसंडी मारत मालिका जिंकली. यावरुन आपण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत त्यावर मात करण्यास सक्षम आहोत, हे सिद्ध होतं. टीम इंडियाच्या या विजयामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली”, असं सीतारमण यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
“या महिन्यात क्रिकेटमधून गोड बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणीनंतर शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आमच्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क ही प्रेरणादायक आहे”,असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं. मोदींनी रविवारी (31 जानेवारी) मन की बात (Mann Ki Baat) या विशेष कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळेस त्यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचा उल्लेख केला.
दरम्यान टीम इंडिया आता इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघ चेन्नईमधील लिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. या उभयसंघात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात आहे. दोन्ही संघांनी गत कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. यामुळे या मालिकेत दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
Union Budget 2021 Marathi LIVE : बजेटमधून महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं? आदित्य ठाकरेंचा सवाल