Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chris Gayle | चौकार-षटकारांचा पाऊस, तब्बल दहा हजार रन्स जागेवर उभा राहून, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम

ख्रिस गेलने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 53 धावांची तडाखेदार खेळी केली.

Chris Gayle | चौकार-षटकारांचा पाऊस, तब्बल दहा हजार रन्स जागेवर उभा राहून, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 6:29 PM

शारजा : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 31 व्या सामन्यात किंग्जस इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 8 विकेट्सने मात केली. दुखापतीतून सावरत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (Chris Gayle) धमाकेदार एंट्री करत बंगळुरुविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. गेलने 53 धावांची तडाखेदार खेळी केली. यात त्याने 5 सिक्स आणि 1 फोर लगावला. गेलने याखेळीसह टी 20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेली हटके कामगिरी केली आहे. Universe Boss Chris Gayle completed 10,000 runs in T20 cricket with just sixes and fours

काय आहे विक्रम?

ख्रिस गेल आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. गेल नेहमीच आपल्या खेळीतील 70 ते 80 टक्के धावा सिक्स आणि फोरच्या मदतीने पूर्ण करतो. असाच रेकॉर्ड गेलने केला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर 13 हजार 349 धावांची नोंद आहे. या धांवांपैकी गेलने 10 हजार धावा या फक्त सिक्स आणि फोरच्या मदतीने पूर्ण केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये गेलने आतापर्यंत 1 हजार 27 फोर आणि 983 सिक्स लगावले आहेत. तसेच टी 20 मध्ये सर्वात आधी 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा गेल हा पहिलाच खेळाडू होता.

गेलची टी 20 कारकिर्द

ख्रिस गेलने आतापर्यंत एकूण 405 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 146 च्या स्ट्राईक रेटने 13 हजार 349 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 शतक आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच टी 20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएल स्पर्धेत ही कामगिरी केली होती. गेलने 2013 साली बंगळुरुकडून खेळताना पुण्याविरुद्ध 66 चेंडूत नाबाद 175 धावांची स्फोटक खेळी केली होती. याखेळीत त्याने 13 फोर आणि 17 सिक्स झोडले होते. गेलने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता, बंगळुरुचे प्रतिनिधित्व केलं आहे. तर तो आता पंजाबकडून खेळत आहे.

गेलला यंदाच्या मोसमात प्रकृती स्थिर नसल्याने खेळता येत नव्हते. गेलला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे गेलवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आता गेल परतला आहे. गेल परतल्याने पंजाबची बॅटिंगसाईड आणखी दमदार झाली आहे. पंजाबची सलामी जोडी म्हणजेच कर्णधार लोकेश राहूल आणि मयंक अगरवाल सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. पण पंजाबला फक्त 2 सामन्यातच विजय मिळाला आहे. त्यामुळे पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान पंजाब आपला पुढील सामना रविवारी 18 ऑक्टोबरला मुंबईविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

IPL 2020 : बँगलोरवर विजय मिळवूनही पंजाबच्या संघावर सचिन तेंडुलकर संतापला

Universe Boss Chris Gayle completed 10,000 runs in T20 cricket with just sixes and fours

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.