IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडिअममध्ये आग लावू, ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीची धमकी
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान वानखेडे स्टेटिअममध्ये आग लावू अशी धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने ट्विटरवरून मुंबई पोलिसांना ही धमकी दिली
मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : वर्ल्ड कप 2023 आता चांगलाच रंगला असून आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पहिला सेमी फायनल सामना पार पडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुपारपासून हा सामना सुरू होणार असून प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. मात्र तत्पूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान वानखेडे स्टेटिअममध्ये आग लावू अशी धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने ट्विटरवरून मुंबई पोलिसांना ही धमकी दिली आहे. या पार्श्श्वभूमीवर स्टेडिअम परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
वर्ल्ड कप 2023मधील भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला सेमी फायनल सामना आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. फायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्याआधी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असून प्रेक्षकांसाठी चांगली सोय केली आहे. पण त्यापूर्वीच ट्विटरवरून ही धमकी मिळाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलत स्टेडिअममधील आणि त्याच्या आसापासच्या परिसरातील बंदोबस्त वाढवून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साममना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयडी कार्ड तपासून, त्याची ओळख पटवून मगच आत पाठवण्यात येत आहे . तसेच बॉम्बसोधक पथकही स्टेडिअममध्ये दाखल झाले असून कसून शोध घेण्यात येत आहे. भारत-न्युझीलंड सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी घातल्या अटी
अटीतटीचा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हजारो संख्येने प्रेक्षक वानखेडेवर दाखल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व सुरळीत पार पडावे, काहीही गंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करताना काही गोष्टींवर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे सामना पाहायला जात असाल तर या गोष्टी बाहेरच ठेवून जाणे इष्ट ठरेल.
स्टेडियममध्ये या गोष्टींवर बंदी
वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगला मनाई केली आहे. एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी केली पार्किंगची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणू नयेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.