वैभव सूर्यवंशी पहिल्याच लिस्ट ए सामन्यात फ्लॉप, राजस्थान रॉयल्सने लावलाय कोट्यवधींचा डाव

गेल्या काही दिवसांपासून 13 वैभव सूर्यवंशी चर्चेत आला आहे. नुकताच अंडर 19 आशिया कप स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीचा रंग दाखवला होता. तसेच आयपीएल 2025 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. असं असताना पहिल्याच लिस्ट ए सामन्यात वैभव सूर्यवंशीला धक्का बसला आहे.

वैभव सूर्यवंशी पहिल्याच लिस्ट ए सामन्यात फ्लॉप, राजस्थान रॉयल्सने लावलाय कोट्यवधींचा डाव
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 4:44 PM

विजय हजारे स्पर्धेत मध्य प्रदेश आणि बिहार हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मध्य प्रदेशने बिहारला 6 विकेट राखून पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकून मध्य प्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 46.4 षटकात 196 धावांवर बिहार संघाला गुंडाळण्यात यश आलं. विजयासाठी मिळालेल्या 197 धावांचं आव्हान 4 गडी गमवून 25.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर सर्वांच लक्ष लागून होते. कमी वयात आयपीएलमध्ये कोट्यवधींचा भाव खाल्याने त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. असं असताना त्याच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या आहे. पण पहिल्या लिस्ट ए सामन्यात वैभवला फारसं काही चांगलं करता आलं नाही. मैदानात उतरल्यावर फक्त दोन चेंडूंचा सामना केला. पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट देत तंबूत परतला. पहिल्याच लिस्ट ए सामन्यात त्याची खेळी 4 धावांवर आटोपली. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली नाही.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताकडून खेळण्याची संधी वैभवला मिळाली होती. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर काही सामन्यात धावा करून निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्याच्या याच खेळीच्या जोरावर बिहारने त्याला संघात जागा दिली होती. पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरला हे देखील तितकंच खरं आहे.

आयपीएल 2024 मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीवर जबरदस्त बोली लागल्याचं पाहायला मिळालं. 30 लाखांच्या बेस प्राईसवर मैदानात उतरला होता. पण त्याची बोली 1.10 कोटीपर्यंत पोहोचली आणि राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. इतक्या कमी वयात आयपीएलमधये कोट्यवधी रुपये घेणारा आयपीएलमधील पहिला खेळाडू ठरला आहे. आता राहुल द्रविडच्या नेतृत्वात त्याच्या क्रिकेट कारकिर्दिला पैलू पडणार आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बिहारचा संघ : बिपिन सौरभ (विकेटकीपर) , साकिबुल गनी (कर्णधार) , पियुष सिंग , ऋषव राज , वैभव सूर्यवंशी , हर्ष राज , हिमांशू सिंग , नवाज खान , मलय राज , सचिन कुमार , प्रबल प्रताप सिंग.

मध्य प्रदेशचा संघ : रजत पाटीदार (कर्णधार) , सुभ्रांशु सेनापती , हरप्रीत सिंग भाटिया , व्यंकटेश अय्यर , हर्ष गवळी (विकेटकीपर) , शुभम श्यामसुंदर शर्मा , कुलवंत खेजरोलिया , आर्यन पांडे , सरांश जैन , आवेश खान , कुमार कार्तिकेय

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.