Virat Kohli : शेवटच्या दोन चेंडू उरलेले असताना नेमकं मैदानात काय झालं ? पाहा व्हिडीओ
काल कोहलीने 28 बॉलमध्ये 49 धावा काढल्या, त्यावेळी दिनेश कार्तिक तिथं होता.
विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव महान फलंदाजांच्या यादीत आहे. कारण त्याने आत्तापर्यंत अनेकदा चांगली खेळी केली आहे. त्याने अनेकदा शतकी पारी खेळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी फलंदाज रिकी पॉटिंग (Ricky Ponting) याला शतकांच्या यादीत मागे टाकले आहे. तसेच टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) तो पाठीमागे आहे. त्यामुळे तो कधीही सचिनचा सुद्धा रेकॉर्ड मोडू शकतो असं रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.
तीन वर्षे विराट कोहलीकडून मोठी खेळी झाली नव्हती. तीन वर्षानंतर आशिया चषकात त्याने मोठी खेळी केली आणि आपल्या नावावर 71 शतक केलं. तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. तसेच विश्वचषकात सुद्धा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
कालच्या झालेल्या सामन्यात त्याला अर्धशतक करण्याची संधी होती. परंतु त्याने ती धुडकावून लावली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
In addition to the run fest, a special moment as we sign off from Guwahati. ☺️#TeamIndia | #INDvSA | @imVkohli | @DineshKarthik pic.twitter.com/SwNGX57Qkc
— BCCI (@BCCI) October 2, 2022
काल कोहलीने 28 बॉलमध्ये 49 धावा काढल्या, त्यावेळी दिनेश कार्तिक तिथं होता.
त्यावेळी दिनेश कार्तिक स्ट्राईकला होता. पहिला बॉल मिस झाला. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने चौकार लगावला. त्यानंतर पुन्हा एक बॉल मिस झाला. चौथ्या चेंडूवर कार्तिकने षटकार लगावला. कार्तिकने विराटला अर्धशतक पुर्ण करण्यासाठी एक धाव काढतो असं सांगितलं. परंतु कोहलीने षटकार लगावण्याचा सल्ला दिला.