Video : स्कॉटलंडचा हा गोलंदाज खेळपट्टीबाहेरून गोलंदाजी करतो, पाहा व्हिडीओ
विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक चांगल्या मॅच झाल्या आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.
मेलबर्न : स्कॉटलडंच्या (scotland) गोलंदाजांने काल खेळपट्टीबाहेरुन गोलंदाजी करुन वेस्टइंडिज टीमच्या (west indies) विकेट घेतल्याने तो अधिक चर्चेत आला आहे. रविवारी सुरु झालेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत दोन दिवसात अतिशच रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. नामिबिया टीमने श्रीलंका टीमचा पराभव केला. तर स्कॉटलडंच्या टीम वेस्ट इंडिज टीमचा 42 धावांनी पराभव केला आहे. कालची मॅच ऑस्ट्रेलियातील ब्लंडस्टोन अरेना इथं झाली.
विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक चांगल्या मॅच झाल्या आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना व्हिडीओ अधिक आवडत असल्याने त्याची चर्चा सोशल मीडियावर अधिक आहे.
View this post on Instagram
कालच्या सामन्यात स्कॉटलडंच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांची धावसंख्या 160 झाली होती. त्याचबरोबर स्कॉटलडंच्या गोलंदाजांनी सुध्दा चांगली गोलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिज टीमने 118 धावा केल्या.
मार्क वैट या गोलंदाजाने कालच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली. त्यामुळे त्यांच्या चार ओव्हरमध्ये फक्त 12 धावा वेस्टइंडिज टीमला काढता आल्या. तसेच तीन विकेट त्याने घेतल्या आहेत. त्यामुळे मार्क वैटचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.
स्कॉटलंड
रिचर्ड बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल लीस्क, ब्रॅडली व्हील, ख्रिस सोल, ख्रिस ग्रीव्हज, सफयान शरीफ, जोश डेव्ही, मॅथ्यू क्रॉस, कॅलम मॅक्लिओड, हमजा ताहिर, मार्क वॉट्स, ब्रँडन मॅकमुलेन, मायकेल जोन्स, क्रेग वॉलेस.
वेस्ट इंडिज संघ
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कारिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रीमोन, ओबेद. स्मिथ