VIDEO : युवराजच्या सहा षटकारांची ऑस्ट्रेलियात पुनरावृत्ती
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहच्या नावे आहे. आता या विश्वविक्रमी षटकारांची पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ओलिवर डेविसने केली आहे. मात्र, डेविसने हा पराक्रम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या अंडर-19 राष्ट्रीय वनडे चँपियनशिप स्पर्धेत केली आहे. या मॅचमध्ये डेविसने सहा चेंडूमध्ये सहा षटकार आणि द्विशतक मारले आहेत. […]
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहच्या नावे आहे. आता या विश्वविक्रमी षटकारांची पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ओलिवर डेविसने केली आहे. मात्र, डेविसने हा पराक्रम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या अंडर-19 राष्ट्रीय वनडे चँपियनशिप स्पर्धेत केली आहे. या मॅचमध्ये डेविसने सहा चेंडूमध्ये सहा षटकार आणि द्विशतक मारले आहेत. त्यामुळे क्रिकेट विश्वातून डेविसच्या या खेळीचे कौतुक केलं जात आहे. क्रिकेट ऑस्टेलियाने दिलेल्या माहितीनुसार, न्यू साऊथ मेट्रो संघाचा कर्णधार डेविसने नॉर्थन टेरेटॉरीविरुद्ध 115 चेंडूंमध्ये 17 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 207 रन केले. विशेष म्हणजे या दरम्यान डेविसने 40 व्या ओव्हरमध्ये सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले. डेविसने युवराज सिंहच्या षटकारांची बरोबरी केली आहे. मात्र, डेविसने ही खेळी अंडर-19 च्या वनडेमध्ये केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये 16 षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनी केले आहेत. तर डेविसने या सामन्यात डेविसने 17 षटकार ठोकत आणखी एक विक्रम केला. सध्या युवराज सिंह खराब फॉर्ममुळे गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर आहे. मात्र, 35 वर्षीय युवराजने 18 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यापैकी युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सहा षटकार ठोकले होते. हा अविस्मरणीय सामना 10-11 वर्षांपूर्वी अर्थात 19 सप्टेंबर 2007 रोजी खेळला गेला होता.
Ball 1: Slog-swept for 6 Ball 2: Slog-swept for 6 Ball 3: Slog-swept for 6 Ball 4: Slog-swept for 6 Ball 5: Slog-swept for 6 Ball 6: Slog-swept for 6
Six balls in an over slog-swept for sixes ? https://t.co/uvh9ND4O9H pic.twitter.com/K5NtaCQmdP — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 3, 2018