VHT 2024 : मुंबईने फक्त 33 चेंडूत सामना जिंकत रचला इतिहास
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं. अरुणाचल प्रदेशचा 9 गडी राखून पराभव केला. हा सामना मुंबई 33 चेंडूत जिंकत इतिहास रचला आहे. मुंबईने सर्वात कमी चेंडूत सामना जिंकून नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
विजय हजारे ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबईने अरुणाचल प्रदेशचा धुव्वा उडवला आहे. अहमदाबादच्या गुजरात कॉलेज मैदानावर मुंबई आणि अरुणाचल प्रदेश हे दोन संघ आमनेसामने आले होते. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रेयस अय्यर विश्रांती देण्यात आल्याने कर्णधारपदाची धुरा शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर होती. प्रथम फलंदाजी करताना अरुणाचल प्रदेशचा डाव 32.2 षटकात अवघ्या 73 धावांत आटोपला. दहाव्या क्रमांकावर असलेल्या याब नियाने संघासाठी सर्वाधिक 17 धावा केल्या, तर सलामीवीर टेची डोरियाने 13 धावांची खेळी केली. संघाच्या उर्वरित तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.कर्णधार शार्दुल ठाकूरने 3 षटकात केवळ 8 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. तर हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अंकोलेकर यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. रॉयस्टन डायस आणि सूर्यांश शेडगे यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आलं.
अरुणाचल प्रदेशने विजयासाठी दिलेल्या 74 धावांचा करताना मुंबईचा सलामीवीर अंगकृष रघुवंशी याने अवघ्या 18 चेंडूंत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.आयुष म्हात्रेच्या रूपाने मुंबईची एकमेव विकेट पडली. त्याने 11 चेंडूत 15 धावा केल्या. अंगकृष रघुवंशीला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुणतालिकेत मुंबई संघ क गटात 3 पैकी 2 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटक संघ आतापर्यंत तीन सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे. पंजाब तिसऱ्या तर सौराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
अरुणाचल प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): बिकी कुमार (विकेटकीपर), नबाम अबो (कर्णधार), तेची नेरी, तेची डोरिया, याब नियाब, आदित्य वर्मा, तडकमल्ला मोहित, नबाम टेम्पोल, अभिनव सिंग, राजेंद्र सिंग, शरद चहर.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर (कर्णधार), विनायक भोईर, हिमांशू सिंग, सिद्धेश लाड, हर्ष तन्ना, रॉयस्टन डायस