चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी करूण नायरची चमकदार कामगिरी, महाराष्ट्राला पराभूत केल्यानंतर म्हणाला..

करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला 69 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत विदर्भाचा सामना कर्नाटकशी होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी करूण नायरची चमकदार कामगिरी, महाराष्ट्राला पराभूत केल्यानंतर म्हणाला..
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 10:41 PM

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ सामना झाला. या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय अंगलट आला असंच म्हणावं लागेल. कारण आघाडीच्या ध्रुव शोरे आणि यश राठोड या जोडीने चांगलंच झुंजवलं. या दोघांनी शतकी खेळी करत पहिल्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या करूण नायरने आपली लय कायम असल्याचं दाखवून दिलं. संपूर्ण स्पर्धेत करूण नायरने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करुण नायरने 5 शतकं ठोकली. उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. अवघ्या 44 चेंडूत नाबाद 88 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. 50 षटकांचा खेळ संपला म्हणून नाही तर या सामन्यातही त्याच्या नावावर शतक असतं, त्याची खेळी पाहून असंच म्हणावं लागेल. विदर्भाने 50 षटकात 3 गडी गमवून 380 धावा केल्या आणि विजयासाठी 381 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही महाराष्ट्राला गाठता आलं नाही. महाराष्ट्राने 50 षटकात 7 गडी गमवून 311 धावा केल्या. हा सामना विदर्भाने 69 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर कर्णधार करूण नायर याने भावना व्यक्त केल्या.

‘हे एक विशेष युनिट आहे. हा एक अप्रतिम प्रवास आहे, आम्हाला अजून एक पायरी चढायची आहे. प्रत्येकाचे योगदान आहे, एकमेकांच्या यशाबद्दल खूप आनंदी आहोत. आणखी एक गेम खेळायचा आहे आणि तो केकवर एक शेवटची चेरी असेल. योगदान लहान असो वा मोठे, प्रत्येकाने कधी ना कधी हातभार लावला आहे. अंतिम फेरीत कर्नाटकचा सामना आहे, तो फायनल आहे. खेळ जिंकण्यासाठी आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल.’, असं करूण नायर याने सांगितलं.

दुसरीकडे, या सामन्यात महाराष्ट्राच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड निराश दिसला. त्याने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, ‘तुम्ही म्हणू शकता की आमचा सुरुवातीपासूनच ऑफ डे होता. पण याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी फलंदाजीने आम्हाला मागे टाकले. आम्ही फील्डमध्ये अधिक चांगले असू शकलो असतो परंतु आज तसा दिवस नव्हता. त्यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली आणि योग्य वेळी वेग वाढवला.’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.