Vinesh phogat : ‘ज्यांनी तुला रडवलं, त्या सगळ्यांना तू…’ विनेश फोगाटच पदक निश्चित होताच राहुल गांधींची खास पोस्ट

| Updated on: Aug 07, 2024 | 9:09 AM

Vinesh phogat : Paris Olympics 2024 मध्ये भारताच आणखी एक पदक निश्चित झालाय. विनेश फोगाट आज कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात फायनल खेळणार आहे. भारताला आज विनेशकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत सर्वच्या सर्व ब्राँझ मेडल मिळाली आहेत. पदकाचा रंग आज बदलणार एवढ मात्र निश्चित आहे.

Vinesh phogat : ज्यांनी तुला रडवलं, त्या सगळ्यांना तू... विनेश फोगाटच पदक निश्चित होताच राहुल गांधींची खास पोस्ट
vinesh phogat in paris olympics women wrestling 2024 final
Follow us on

भारताच्या विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कमाल केलीय. विनेशने फायनलमध्ये प्रवेश केलाय. महिला कुस्तीच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 50 किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला. समोरच्या महिला कुस्तीपटूला रिंगमध्ये डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. विनेशने 5-0 ने विजय मिळवला. विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये तिचं पदक निश्चित केलय. विनेश फोगाटकडून सर्वांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. विनेशने सेमीफायनल मॅचमध्ये क्यूबाच्या युसनेलिस गुजमॅन लोपेजवर विजय मिळवला.

विनेश फोगाटच्या या विजयाने संपूर्ण देशात उत्साह आहे. सर्व जण तिला शुभेच्छा देत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया एक्सवर त्यांनी विनेशसाठी पोस्ट केलीय. “एकाच दिवशी जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना हरवल्यानंतर विनेशसोबत आज पूर्ण देश भावुक आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला. त्यांचा हेतू आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्या सर्वांना आज उत्तर मिळालय” असं राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ते आपलं उत्तर मैदानात देतात

“आज भारताच्या शूर, हिम्मतवान मुलीसमोर सत्तेच पूर्ण तंत्र कोलमडून पडलय, ज्यांनी तिला रडवलं. चॅम्पियन्सची हीच ओळख असते. ते आपलं उत्तर मैदानात देतात. तुला खूप शुभेच्छा विनेश. पॅरिसमधल्या तुझ्या यशाचा प्रतिध्वनी दिल्लीमध्ये स्पष्ट ऐकू येतोय” असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलय.


राहुल गांधींशिवाय काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या. “जगातील नंबर 1 खेळाडूला तू हरवलं आहेसच, पण मैदानाच्या आतील आणि बाहेरील संघर्षांचा सुद्धा हा विजय आहे” समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विनेश फोगाटचा हा विजय फक्त हा खेळाचा विजय नाही, खूप मोठा मानसिक विजय असल्याचं म्हटलं आहे.