मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी काही दिवसांपूर्वी लिलाव प्रक्रिया (IPL Auction 2021) पार पडली. या लिलावातून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 20 लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या ताफ्यात घेतलं. यानंतर अर्जुनवरुन सोशल मीडियावर घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली. तसेच अर्जुनला नेटीझन्सच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर सचिनचा कट्टर मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) अर्जुनच्या समर्थनासाठी धावून आला आहे. विनोदने अर्जुनचे समर्थन केलं आहे. तसेच अर्जुनला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, असे आवाहन विनोद कांबळीने केलं आहे. (Vinod Kambli appeals to fans said Encourage Arjun Tendulkar to play)
The hard work and love for the game that I've seen in Arjun is immense. During the MPL, we used to have long chats about the game and it was so good to see his dedication for the game.
He's just begun, so like any other youngster, let's motivate him to do well ?? pic.twitter.com/Gg6aos6HAg— Vinod Kambli (@vinodkambli349) February 21, 2021
कांबळीने अर्जुनसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. “अर्जुनचे क्रिकेटप्रति असलेले प्रेम आणि निष्ठा मी पाहिली आहे. मुंबई प्रीमियर लीग दरम्यान आम्ही दोघे क्रिकेटबाबतीत फार चर्चा करायचो. अर्जुनची खेळाप्रती फार निष्ठा आहे. अर्जुनने क्रिकेटमध्ये नुकतीच सुरुवात केली आहे. इतर कोणत्याही युवा खेळाडूप्रमाणे आपण अर्जुनला चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करुयात, असं आवाहन कांबळीने क्रिकेट चाहत्यांना ट्विद्वारे केलं आहे.
“अर्जुन खूप मेहनती आहे. त्याला बरेच काही शिकायचे आहे. अर्जुन सचिनचा मुलगा असल्याचा दबाव त्याच्यावर नेहमीच असणार आहे. त्याला या दबावाबरोबरच रहावे लागेल. अर्जुन टीम बरोबर असण्याची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएल 2020 च्या आधी तो नेट बॉलर म्हणून संघासह युएईमध्ये गेला होता”, असं मुंबई इंडियन्सचा बोलिंग कोच झहीर खान म्हणाला होता.
” अर्जुन मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे त्याचे वडिल आहेत. सचिन क्रिकेटचं विद्यापीठ आहे. अर्जुनला आपल्या वडीलांकडून खूप काही शिकता येऊ शकतं. अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे”, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा म्हणाला होता.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, नॅथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जॅनसन, अर्जुन तेंडुलकर आणि जेमी निशाम.
संबंधित बातम्या :
(Vinod Kambli appeals to fans said Encourage Arjun Tendulkar to play)