Vinod Kambli : एकदा नव्हे दोनदा चढला बोहोल्यावर, घटस्फोटित विनोद कांबळीवर कशी फिदा झाली अँड्रिया हेविट ?

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा त्याच्या खेळापेक्षा इतर गोष्टींमुळे, त्याच्या वागण्यामुळेच जास्त चर्चेत होता. सध्या त्याचा एका समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची बरेच चर्चा सुरू आहे.

Vinod Kambli : एकदा नव्हे दोनदा चढला बोहोल्यावर, घटस्फोटित विनोद कांबळीवर कशी फिदा झाली अँड्रिया हेविट ?
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 1:16 PM

टीम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र असलेला विनोद कांबळी हा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरम झाले, त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघे भेटले होते. जाहीर मंचावर झालेल्या या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेथे मंचावर विनोद कांबळी एका बाजूस बसलेला होता, ते पाहून सचिन त्याची भेट घेण्यासाठी गेला. सचिनला पाहून विनोद कांबळीला खूप आनंद झाला, त्याने त्याचा हात हातात घेतला, तो उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला धड नीट उभ राहताही येईना. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तेव्हापासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत.

विनोदची अवस्था पाहून बरेच लोक हळहळत आहेत. पहिल्यापासून विनोद कांबळी हा त्याच्या खेळापेक्षा कमी तर इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत होता. सध्या चर्चेत असलेल्या विनोदचे वैयक्तिक आयुष्यही बरेच चर्चेत होतं. या खेळाडूची एक नव्हे दोन लग्न झाली. त्याचं पहिलं लग्न हे नाइला लुइस हिच्यासोबत झालं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. पहिलं लग्न मोडल्यानंतर विनोद कांबळीने 2006 साली अँड्रिया हेवीटसोबत झालं. 2000 साली त्यांची भेट झाली होती. त्यांन एकमेकांना 6 वर्ष डेट केलं आणि मग 2006 मध्ये त्यंनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या 4 वर्षानंतर 2010 साली त्यांना एक मुलगाही झाला.

मुलाच्या जन्मानंतर पुन्हा केलं लग्न

त्यानंतर विनोद कांबळी आणि अँड्रियाने 2014 मध्ये सेंट पीटर्स चर्च, वांद्रे हिल रोड येथे ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा लग्न केले. या लग्नात त्यांचा मुलगाही सहभागी झाला होता. त्याच वर्षी त्यांना ऑक्टोबर महिन्यात एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी जोहाना क्रिस्टियानो ठेवले.

अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये केलं काम

अँड्रिया ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध मॉडेल होती. प्रिंट मीडियातील अनेक जाहिरातींच्या कव्हर पेजवरही ती दिसली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती प्रसिद्धीपासून दूर राहून पती विनोद कांबळीसोबत राहत आहे. अँड्रियाने तनिष्क ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीमधून आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर तिने बराच काळ मुंबईत ब्युटी कन्सल्टंट म्हणूनही काम केले.

सध्या लाईमलाईटपासून आहे दूर

सध्या अँड्रिया मॉडेलिंग करत नाही, सध्या की कोणत्याही मोठ्या मॉडेलिंग प्रोजेक्टशी जोडलेली नसली तरी तिचे सौंदर्य अजूनही अबाधित आहे. अँड्रिया ही फिटनेस फ्रीक मानले जाते आणि ती अनेकदा वर्कआउटसाठी जिममध्ये जाताना स्पॉट होते.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.