Video : मालिका जिंकल्यानंतर विराट रोहितचा ‘हाय जोश’व्हिडीओ व्हायरल
सुर्यकुमार यादवने सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली.
टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सुरु असलेल्या मालिकेमध्ये बरोबरीत होते. दोन्ही टीमने एक एक विजय मिळविला होता. त्यामुळे कालच्या अंतिम सामन्यात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सुरुवातील ऑस्ट्रेलिया टीमने फलंदाजीला केली. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई सुरु होती. कारण पहिल्या षटकापासून जोरदार बॅटींग सुरु झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीम मोठी धावसंख्या उभारणार एव्हढं मात्र नक्की होतं. ऑस्ट्रेलिया टीमने 186 धावसंख्या उभारली. डेविड (Devid) आणि कैमरून ग्रीन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमने मोठी धावसंख्या उभारली.
Moment hai bhai?? pic.twitter.com/wtKZR4OYin
हे सुद्धा वाचा— gautam (@itsgautamm) September 25, 2022
pt>
टीम इंडियाच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचं सिद्ध झालं. कारण आशिया चषकापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती जोरदार टीका सुरु आहे. काल पुन्हा खराब कामगिरी पाहायला मिळाली.
भुवनेश्वर, पटेल, बुमराह यांची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगलीचं धुलाई केली. त्यामुळे पुन्हा टीम इंडिया विश्व चषक स्पर्धेत दबाब येण्याची शक्यता आहे.
केएल राहूल बाद झाल्यानंतर विराट आणि रोहितने काही काळ मैदानावर फटकेबाजी केली, त्यानंतर रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
सुर्यकुमार यादवने सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याला विराट कोहलीने चांगली साथ दिली. दोघांनी काल अर्धशतकी पारी खेळल्यामुळे टीम इंडिया जिंकू शकली.
टीम इंडियाला शेवटच्या षटकात अकरा धावांची गरज होती. त्यावेळी पहिल्या चेंडूवर विराट कोहलीने षटकार मारला. तसेच दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा चिंता वाटतं होती. रोहित शर्मा थेट पायऱ्यांवर जाऊन बसला.
हार्दीक पांड्याने ज्यावेळी चौकार लगावला त्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्माने पायऱ्यांवर आनंद साजरा केला.