Virat Kohli : अवॉर्ड मिळाल्यानंतर कोहलीचा अनोखा अंदाज पाहून चाहते खूष
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांना अवॉर्ड देण्यात आले.
ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध टीम इंडियाने (Team India) शानदार विजय मिळविल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर अंतिम सामन्यात खेळाडूंनी आपली चुणूक दाखवल्याने त्याचे व्हिडीओ (Video) सुद्धा अधिक व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्नचषक स्पर्धेत टीम इंडियाचा विश्वास अधिक वाढेल. गोलंदाजांना अजून लय सापडलेली नाही अशी स्थिती आहे. कारण त्यांच्याकडून अजून समाधानकारक कामगिरी झालेली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांना अवॉर्ड देण्यात आले. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा सुर्यकुमार यादवला ‘प्लेयर ऑफ द मैच’ हा अवॉर्ड देण्यात आला.
???? pic.twitter.com/mCKUQNfOGh
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 26, 2022
विराट कोहलीकडे एकहाती सामना जिंकण्याची ताकद असल्याने त्याने सुर्यकुमार यादवच्या मदतीने धावसंख्या एका बाजूने वाढती ठेवली. त्यामुळे त्याला सुद्धा एनर्जेटिक प्लेअर अवॉर्ड देण्यात आला.
अवॉर्ड मिळाल्यानंतर विराट कोहलीने एक अनोखी स्टाईल केली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ चाहत्यांना अधिक आवडला सुध्दा आहे.