‘बापमाणूस’ विराट कोहलीला डेव्हिड वॉर्नरकडून खास शुभेच्छा, म्हणतो, ‘टिप्ससाठी मेसेज कर…!’

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने 'विरानुष्का'ला शुभेच्छा दिल्या आहेत.

'बापमाणूस' विराट कोहलीला डेव्हिड वॉर्नरकडून खास शुभेच्छा, म्हणतो, 'टिप्ससाठी मेसेज कर...!'
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 2:51 PM

सिडनी :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली  (Virat kohli) 11 जानेवारीला बापमाणूस बनला. विराटची पत्नी अनुष्काने (Anushka Sharma) एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. (Virat Anushka Daughter) विराटने ट्विट करुन ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली. विराटच्या ट्विटवर करोडो चाहत्यांनी विराट-अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने ‘विरानुष्का’ला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच काही टिप्स पाहिजे असतील तर सरळ मला मेसेज कर, असा मेसेज वॉर्नरने इन्स्टाग्रामवर विराटच्या पोस्टखाली केला आहे. (Virat Kohli became the daughter father, David Warner said Message for tips)

विराटने सोमवारी आपण बाबा झालो असल्याची गुड न्यूज दिली. त्याच्या गुडन्यूजवर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं तसंच त्याला शुभेच्छा दिल्या. वॉर्नर आणि कोहली चांगले मित्र आहेत. विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर वॉर्नरने मजेशीर मेसेज करत काही टिप्स हव्या असतील तर मला मेसेज कर, अशा अनोख्या शुभेच्छा दिल्या.

डेव्हिड वॉर्नरलाही तीन मुली आहेत. वॉर्नरने कोहलीला शुभेच्छा तर दिल्याच आहेत परंतु पॅरेंटिंग टिप्सही दिल्या आहेत. वॉर्नरचा हाच टिप्सवाला मेसेज सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी खेळल्यानंतर पॅरेंटल लिव्हवर विराट मायदेशी परतला. काल 12 जानेवारीला अनुष्काने एका सुंदर मुलीला जन्म दिला.

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

अनुष्का शर्माला मुलगी होणार असल्याची भविष्यवाणी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाने केली होती. विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार असल्याचे या ज्योतिषाने सांगितले होते. ही भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे.

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

काही दिवसांपूर्वी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा हिने आपल्या बाळाला काही दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. विराट आणि मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या जंजाळात गुंतवायचे नाही. त्यामुळे आम्ही बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असं अनुष्काने म्हटलं होतं.

(Virat Kohli became the daughter father, David Warner said Message for tips)

संबंधित बातम्या

Virat Anushka Daughter: विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.