Virat Kohli Birthday: जगभरातल्या चाहत्यांच्या विराटला वाढदिवसाच्या हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा, सोशल मीडियावर कमेंटचा महापूर
पाकिस्ताचा गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : आज विराट कोहलीचा (Virat Kohli Birthday) 34 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांनी विराट कोहलीला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. कालपासून विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटचे चाहते एकदम खूश आहेत.
Virat Kohli fans celebrating the birthday of their idol. pic.twitter.com/MLvP7OJrMx
हे सुद्धा वाचा— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2022
पाकिस्ताचा गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर भारतीय चाहत्यांचं त्याने मनं जिंकलं आहे. विराटला शुभेच्छा द्यायला उशिर का करायचा ? विराटने क्रिकेटला चांगले दिवस आणले अशा हटके शुभेच्छा शहनवाज दहानी याने दिल्या आहेत.
Just couldn’t wait for 5th Nov to wish the artist who made cricket the most beautiful. Happy birthday @imVkohli the #GOAT?. Enjoy your day brother & Keep entertaining the world. ❤️?. pic.twitter.com/601TfzWV3C
— Shahnawaz Dahani (@ShahnawazDahani) November 4, 2022
विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर #HappyBirthdayViratKohli, #ViratKohliBirthdayCDP, #ViratKohli या हॅशटॅग द्वारे चाहते शुभेच्छा देत आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीकडून उर्वरीत सामन्यात चांगली कामगिरी व्हावी अशा देखील शुभेच्छा चाहते देत आहेत.