विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप
विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. विशेष म्हणजे विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात लवकर बाद होण्याची परंपरा कर्णधार विराट कोहलीने यावेळीही कायम ठेवली.
लंडन : ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलंय. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. यासोबतच विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. विशेष म्हणजे विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात लवकर बाद होण्याची परंपरा कर्णधार विराट कोहलीने यावेळीही कायम ठेवली.
विराट कोहली 2015 च्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये एक धाव करुन बाद झाला होता. त्याअगोदर 2011 च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीला 9 धावा करता आल्या होत्या. तेव्हा तो वाहब रियाजच्या गोलंदाजीवर उमर अकमलकडे झेल देऊन बाद झाला होता.
विश्वचषक सेमीफायनलमध्ये विराट कोहलीची कामगिरी
9(21) वि. पाकिस्तान (2011 विश्वचषक)
1(13) वि. ऑस्ट्रेलिया (2015 विश्वचषक)
1(6) वि. न्यूझीलंड (2019 विश्वचषक)
विश्वचषकातील नॉकआऊट सामन्यात विराटची कामगिरी
24(33) – वि. ऑस्ट्रेलिया (क्वार्टर फायनल, 2011 विश्वचषक)
9(21) – वि. पाकिस्तान (सेमीफायनल, 2011 विश्वचषक)
35(49)- वि. श्रीलंका (फायनल, 2011 विश्वचषक)
3(8) – वि. बांगलादेश (क्वार्टर फायनल, 2015 विश्वचषक)
1(13) – वि. ऑस्ट्रेलिया (सेमीफायनल, 2015 विश्वचषक)
1(6) – वि. न्यूझीलंड (सेमीफायनल, 2019 विश्वचषक)
जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा विश्वचषकाच्या नॉकाऊट सामन्यातला विक्रम भारतीय संघाची चिंता वाढवणारा आहे. नॉकआऊट सामन्यात 12.16 च्या सरासरीने त्याने केवळ 73 धावा केल्या आहेत.