Virat Kohli: या कारणामुळे विराट कोहली आऊट झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय
विराट कोहली आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या कारण
मुंबई : टीम इंडियाचा (IND) दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) नेहमी चर्चेत असतो. एकतर त्याच्या स्टाईलमुळे आणि दुसरं त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे, परंतु सध्या विराट कोहली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा कालचा आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कालच्या कसोटी सामन्यात (Test Match) त्याच्याकडून टीमला अधिक अपेक्षा होत्या. पण तो एक धाव काढून बाद झाला.
तैजुल इस्लाम हा बांगलादेशचा महान गोलंदाज आहे, त्याने कालच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करुन विकेट सुद्धा घेतल्या आहेत. विराट कोहलीला तैजुल इस्लाम याने LBW आऊट केल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार आनंद व्यक्त केला. कारण विराट कोहली टीम इंडियासाठी मागच्या अनेक दिवसांपासून अधिक धावा करीत आहे.
काल ज्यावेळी विराट कोहली खेळत होता. त्यावेळी तैजुल इस्लाम याचा चेंडू कोहलीला समजला नाही. त्यामुळे तो चिंतेत असल्याचं जाणवतं होतं. कारण LBW ची अपील केल्यानंतर काही काळ तो पुजाराकडे पाहत होता. त्यानंतर त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.