विराट कोहलीच्या एका इंस्टाग्राम पोस्टची कमाई मॅचच्या 22 पट जास्त
चौकार षटकारांनी क्रिकेटचे मैदान गाजवणारा विराट सोशल मीडियावरही फार सक्रिय असतो. म्हणूनच विराटच्या एका पोस्टची कमाई हा त्याच्या कोणत्याही सामन्याच्या तब्बल 22 पट जास्त आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने अनेक रिकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. चौकार षटकारांनी क्रिकेटचे मैदान गाजवणारा विराट सोशल मीडियावरही फार सक्रिय असतो. आपल्या खाजगी आयुष्यापासून क्रिकेटपर्यंतचे सर्व फोटो विराट आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. यामुळे त्याची इंस्टाग्रामवरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच विराटच्या एका पोस्टची कमाई हा त्याच्या कोणत्याही सामन्याच्या तब्बल 22 पट जास्त आहे.
हॉपर एचक्यू या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा प्रकारात इंस्ट्राग्रामवर सर्वाधिक कमाई करण्याच्या टॉप 10 व्यक्तींमध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत विराट 9 व्या क्रमांकावर असून बाकी इतर स्थानावर फुटबॉलपटू आहेत. या यादीच्या पहिल्या क्रमांकावर पुर्तगालचे स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोनंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आणि अर्जेंटीना यांचा नंबर लागतो. तर या दोघांना दिग्गज फुटबॉल खेळाडू मेस्सीचा क्रमांक लागतो. सध्या विराटचे इंस्टाग्रामवर 38 मिलीयन म्हणजेच 3 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.
तसेच विराट कोहली हा इंस्टाग्राम इंफ्लूएंसर्स म्हणूनही ओळखला जातो. इंस्टाग्राम इंफ्लूएंसर्स म्हणजेच इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून फॉलोअर्सला प्रभावित करणे. म्हणजेच विराट हा फॉलोअर्सला प्रभावित करणाऱ्या सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. याच कारणामुळे विराटच्या एका प्रमोशनल पोस्टसाठी त्याला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो.
विराट कोणत्याही सामन्याच्या तब्बल 22 पट जास्त कमाई एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे करतो. विराटला त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमागे 1,96,000 डॉलर म्हणजेच 1 कोटी 35 लाख मिळतात.
View this post on InstagramDon’t know about football, but Manchester was blue today! ??? Comprehensive team victory. ✌? #CWC19
खेळाडूंची इंस्टाग्रामच्या एका पोस्टची कमाई
- क्रिस्टियानो रोनाल्डो – फुटबॉल – 784000 पाउंड (6 कोटी 73 लाख)
- नेमार – फुटबॉल – 580000 पाउंड (4 कोटी 98 लाख)
- लियोनल मेसी – फुटबॉल – 521000 पाउंड – (4 कोटी 47 लाख)
- डेविड बैकहम – फुटबॉल – 287000 पाउंड (2 कोटी 46 लाख)
- लेब्रोन जेम्स – बास्केटबॉल – 219000 पाउंड (1 कोटी 88 लाख)
- रोनाल्डिन्हो – फुटबॉल – 206000 पाउंड (1 कोटी 76 लाख)
- गैरेथ बेल – फुटबॉल – 175000 पाउंड (1 कोटी 50 लाख)
- इब्राहिमोविच – फुटबॉल – 161000 पाउंड (1 कोटी 38 लाख)
- विराट कोहली – क्रिकेट – 196000 पाउंड (1 कोटी 35 लाख)
- लुईस सुआरेज – फुटबॉल – 148000 पाउंड (1 कोटी 27 लाख)
संबंधित बातम्या :
विश्वविजेत्या इंग्लंडची आयर्लंडने हवा काढली, 85 धावात ऑलआऊट
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांचंही नाव, सेहवाग, जयवर्धनेही शर्यतीत!