Virat Kohli | कोहलीचा मैदानाबाहेरही कडक रेकॉर्ड, इंस्टाग्रामवर विराटचे 100 मिलियन फॉलोअर्स

विराट कोहली (Virat Kohli) इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स ( 100 million followers on instagram) असणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Virat Kohli | कोहलीचा मैदानाबाहेरही कडक रेकॉर्ड, इंस्टाग्रामवर विराटचे 100 मिलियन फॉलोअर्स
विराट कोहली (Virat Kohli) इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स ( 100 million followers on instagram) असणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:52 AM

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचा कॅप्टन. विराटने आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. तसेच दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक शतकं लगावणारा फलंदाज आहे. विराट एक खेळाडू आणि कर्णधार म्हणूनही तेवढाच यशस्वी राहिला आहे. विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विराटने याबाबतीत फक्त धोनीच नाही तर, शाहरुख-सलमान खान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पछाडलं आहे. विराटचे इंस्टाग्रामवर 100 मिलियन (Virat Kohli 100 million followers on Instagram) म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. अशा प्रकारे 10 फॉलोअर्स मिळवणारा विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (Virat Kohli first cricket star to hit 100 million followers on Instagram)

जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स कुणाचे?

जगभरात इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. रोनाल्डोचे एकूण 26.6 कोटी इतके फॉलोअर्स आहेत. यानंतर एरियाने ग्रांडे (22.4 कोटी), अभिनेता ड्वेन जॉनसन (2.20 कोटी), काइल जेनर (2.18 कोटी) इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

विराट एकूण चौथा खेळाडू

इंस्टाग्रामवर 10 कोटींपेक्षा अधिक फॉलोवर्स असलेले एकूण 4 खेळाडू आहेत. यामध्ये रोनाल्डो व्यतिरिक्त लियोनल मेस्सी (18.7 कोटी), ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार (14.7 कोटी) आणि त्यानंतर विराटचा नंबर आहे.

कोहलीनंतर प्रियांका चोप्रा दुसरी भारतीय

भारतात विराटनंतर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबाबतीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नंबर आहे. प्रियांकाचे एकूण 6.08 कोटी इतके फॉलोअर्स आहेत. तर त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरचे 5.8 कोटी फॉलोअर्स आहेत. दीपिका पादुकोणचे 5.33 कोटी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 5.12 कोटी फॉलोअर्स आहेत.

क्रिकेटमध्ये विराटनंतर धोनी

हीच आकडेवारी क्रिकेटच्या बाबतीत पाहायची झाल्यास विराटनंतर महेंद्र सिंह धोनीचे सर्वाधिक फॅन फॉलोइंग आहे. तर त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो.

चौथी कसोटी 4 मार्चपासून

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्ज

India vs England 4th Test | चौथ्या कसोटीआधी विराटसेनेचा जोरदार सराव, इंग्लंडला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

(Virat Kohli first cricket star to hit 100 million followers on Instagram)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.