सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Ind Vs Aus 2020) टी-ट्वेन्टी मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिका विजयासह कर्णधार विराटने ऐतिहासिक कामगिरी केली. विराट ऑस्ट्रेलियाविरोधात तीनही फॉरमॅटमध्ये सीरिज जिंकवून देणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. (Virat kohli First indian Captain To Win india All three Format Series Against Australia)
कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने पराभव केला होता. टीम इंडियाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. मात्र या वेळेस टीम इंडियाला टी 20 सीरिज जिंकण्यास अपयश आले होते. 3 सामन्यांची टी 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. तर उर्वरित 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर या दौऱ्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेन्टी मालिका 2-1 अशी जिंकली
विराट दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात टी 20 मालिका जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीनेही या सर्व संघांविरोधात टी 20 मालिकेत नेतृत्व केलं. मात्र धोनीला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिका जिंकण्यास अपयश आले होते.
2018/2019- 4 कसोटी सामन्यांची मालिका- (भारताने 2-1 ने मालिका जिंकली )
2018/2019- 3 सामन्यांची नवडे मालिका- (भारताने 2-1 ने मालिका जिंकली)
2020- 3 सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका- भारताने (2-1 ने मालिका जिंकली)
एकीकडे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे आशियामधले कसोटी क्रिकेट खेळणारे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकली नाही.
(Virat kohli First indian Captain To Win india All three Format Series Against Australia)
संबंधित बातम्या