Virat Kohli : विराट कोहलीची रोहित शर्माने घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल
पुढचा ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावेळी आमची कामगिरी चांगली होईल असं विराट कोहलीने व्हायरल झालेल्या व्हिडीओत सांगितलं आहे.
आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय खेळाडूंची सुपर 4 च्या मॅचमध्ये चांगली कामगिरी झाली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) खेळाडूंचा प्रेक्षकांनी चांगलाचं समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे टीम इंडिया (Team India) पराभूत झाली. विराट कोहलीने फक्त काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.
What happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ ?
हे सुद्धा वाचाLaughs, mutual admiration & a lot of respect ?- by @ameyatilak
Full interview ?️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLh
— BCCI (@BCCI) September 9, 2022
अफगाणिस्तान सोबत काल टीम इंडियाची मॅच झाली. हा कालचा सामना औपचारिक होता. कारण पाकिस्तान विरुद्ध ज्यावेळी टीम इंडिया हारली. त्याचवेळी टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर झाली होती. कालच्या सामन्यात विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे त्यांच्या नावावर नवा रेकॉर्ड झाला आहे.
अफगाणिस्तान विरुद्धा विराट कोहलीने शतक मारल्यानंतर रोहित शर्माने त्याची मुलाखत घेतली. हा मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामध्ये रोहित शर्मान 71 शतकं पुर्ण केल्याबद्दल विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रोहित शर्माने विराटला त्यांच्या फॉर्मबाबत विचारले, त्यावेळी विराटने डोळे वटारल्याचे पाहायला मिळाले.
पुढचा ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावेळी आमची कामगिरी चांगली होईल असं विराट कोहलीने व्हायरल झालेल्या व्हिडीओत सांगितलं आहे.