विराटला रायगडावर जाण्याची ओढ, छत्रपती संभाजीराजेंशी भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली असून दोघांमध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटवर गप्पा झाल्या.

विराटला रायगडावर जाण्याची ओढ, छत्रपती संभाजीराजेंशी भेट
Follow us
| Updated on: Oct 13, 2019 | 4:40 PM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला रायगडावर जाण्याची इच्छा असल्याचं राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले (Virat Kohli meets Sambhajiraje) यांनी सांगितलं. कोहलीसोबत भेटीचा फोटो संभाजीराजेंनी फेसबुकवर शेअर केला आहे.

विराट कोहलीसोबत महाराष्ट्राच्या क्रिकेटवर बोललो. भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी आमची भेट घडवून आणली. आमच्या भेटीआधी जतीननी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल कदाचित. त्यामुळे विराटने स्वतःहून रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली, असं संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

येत्या काळात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही संभाजीराजेंनी (Virat Kohli meets Sambhajiraje) सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केली. ही विराटच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी तर ठरलीच, पण एखाद्या भारतीय कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. सोबतच विराटने सातवं द्विशतक ठोकण्याची किमयाही साधली.

अब की बार 250 पार, पुण्यात कोहलीची ‘रन’धुमाळी, रहाणे-जाडेजासोबत ‘महायुती’!

कोण आहेत संभाजी महाराज?

छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याशी ते संबंधित आहेत. छत्रपती संभाजीराजे हे चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. 11 जून 2016 रोजी राष्ट्रपतींनी राज्यसभेच्या खासदारपदी त्यांची नियुक्ती केली होती. संभाजी राजेंची नियुक्ती ही भाजपच्या कोट्यातून मानली जाते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.