असं काय झालं की विराट कोहली फुटबॉल खेळता खेळता लाजला अन् थेट तोंडच लपवलं…!
कर्णधार विराट कोहली सध्या फुटबॉल खेळण्यात व्यस्त आहे. त्याचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. (Virat kohli Play Football Accidental CrossBar Challenge before india tour of England)
मुंबई : विराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ( India Tour of England) जातोय. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) आणि नंतर इंग्लंडविरोधात (India vs England) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. येत्या 2 जून रोजी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतोय. तत्पूर्वी कोरोना नियमांच्या अटी आणि नियमांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय संघ मुंबईत क्वारन्टाईन आहे. एकमेकांच्या साथीने जोरदार सरावही सुरु आहे. कर्णधार विराट कोहली सध्या फुटबॉल खेळण्यात व्यस्त आहे. त्याचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. (Virat kohli Play Football Accidental CrossBar Challenge before india tour of England)
विराट कोहली फुटबॉल खेळता खेळता लाजला
विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्याच्यात तो फुटबॉलचा आनंद घेताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो गोल करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याच्याकडून काही गोल झाला नाही. किक मारल्यानंतर बॉल गोल पोस्टच्या खंबाला जाऊन धडकला आणि तिथून बॉलची दिशा बदली. आपला नेम चुकला हे लक्षात येताच विराटने आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवले आणि चेहरा लपवला म्हणजे विराट थोडासा लाजला.
View this post on Instagram
विराट एका फुलबॉल टीमचा मालक
विराटचा जसा श्वास क्रिकेट आहे तसा फुटबॉलचा देखील त्याला खूप छंद आहे. इंडियन सुपर लीगमधील एफसी गोवा ही त्याच्या मालकीची टीम आहे. या फुटबॉल क्लबमध्ये 12 टक्के त्याचा हिस्सा आहे.
विराटच्या फुटबॉल व्हिडीओवर एफ सी गोवाने कमेंट करत विराटच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. व्वा काय प्रयत्न होता…. असं म्हणत एफसी गोवाने विराटच्या गोल करण्याच्या प्रयत्नांची तारीफ केली आहे. तसंच भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने हर्ट इमोजी पोस्ट केली आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे. त्याअगोदर मुंबईत भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे.
(Virat kohli Play Football Accidental CrossBar Challenge before india tour of England)
हे ही वाचा :
‘राहुल द्रविड सरांची थोडी भीती वाटते पण….’; पृथ्वी शॉ ने सांगितला खास अनुभव
WTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती, टीम इंडियाचं ‘मिशन-400’ नेमकं काय?