IPL 2021 : मुंबईविरुद्ध पहिलीच मॅच, विराट कोहलीचं मॅचअगोदर ट्विट, संघ पाठीराख्यांना म्हणतो…
सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) या दोन्ही संघादरम्यान पार पडणार आहे. | Virat kohli ready Against MI Opening Match Mi vs RCB
चेन्नई : आयपीएलच्या 14 पर्वाला (IPL 2021) आज थाटात सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) या दोन्ही संघादरम्यान पार पडणार आहे. आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन (MA Chidambaram Stadium Chennai) या सामन्याला सुरुवात होईल. मॅच अगोदर काही तास ट्विट करत विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या चाहत्यांना तसंच संघ पाठीराख्यांना एक मेसेज दिला आहे. (Virat kohli ready Against MI Opening Match Mi vs RCB)
विराट कोहलीने काय ट्विट केलंय…?
आयसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल 2021 च्या सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबईविरुद्धच्या मॅचअगोदर आपल्या चाहत्यांना तसंच आरसीबीच्या पाठीराख्यांना एक दमदार मेसेज दिला आहे. कोहलीने आपल्या ट्विटरवरुन 4 फोटो शेअर केले आहेत. “मी फोकस्ड आहे… आणि पुढे जाण्यासाठी मी तयार आहे”, असं म्हणत त्याने आरसीबी मुंबईला नमविण्यासाठी सज्ज असल्याचं एकप्रकारे ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
Focused & ready to go.#playbold @RCBTweets pic.twitter.com/HeIRkiQ3P5
— Virat Kohli (@imVkohli) April 8, 2021
लागोपाठ दोन वेळा मुंबईने आयपीएलचा करंडक आपल्या नावे केलाय. आता सलामीच्या लढतीत विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची ब्लू आर्मी सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरु संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे.
सामना कधी आणि कुठे…?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
सामना किती वाजता सुरु होणार?
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.
लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.
(Virat kohli ready Against MI Opening Match Mi vs RCB)
हे ही वाचा :
IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!