भारताचा मोठा निर्णय, विराटला विश्रांती, नवा कर्णधार कोण?

नेपियर (न्यूझीलंड): पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडचा तब्बल 8 विकेट्स राखून धुव्वा उडवल्यानंतर, भारतीय संघाने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने रनमशीन विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीला संपूर्ण टी ट्वेण्टी मालिकेतही खेळवण्यात येणार नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली […]

भारताचा मोठा निर्णय, विराटला विश्रांती, नवा कर्णधार कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नेपियर (न्यूझीलंड): पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडचा तब्बल 8 विकेट्स राखून धुव्वा उडवल्यानंतर, भारतीय संघाने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने रनमशीन विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीला संपूर्ण टी ट्वेण्टी मालिकेतही खेळवण्यात येणार नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया 5 वन डे आणि 3 टी ट्वेण्टी सामने खेळणार आहे. त्यामुळे आता विराट कोहली केवळ दोन सामन्यांमध्येच भारताचं नेतृत्व करताना दिसेल. त्यानंतर उर्वरीत सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा विराटऐवजी रोहित शर्मा सांभाळेल. विराटचा बदली म्हणून कोणत्याही खेळाडूची निवड झालेली  नाही.

नुकतंच भारताने दीर्घ असा ऑस्ट्रेलिया दौरा केला. त्यानंतर लगेचच टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर मग ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. मग आयपीएल आणि त्यानंतर वन डे विश्वचषकाला सुरुवात होईल. त्यामुळे भारताचं संपूर्ण वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. परिणामी दुखापत टाळून विश्वचषकाच्या लढाईसाठी भारताचे सर्व खेळाडू फिट कसे राहतील यासाठी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापक प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया भारतात येणार ऑस्ट्रेलिया आता भारत दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलंय. मायदेशात होणाऱ्या या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामने आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. टी-20 सामने 24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे बंगळुरु आणि विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात येतील. त्यानंतर हैदराबादमध्ये 2 मार्चपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील वन डे मालिका

पहिला सामना – 2 मार्च, हैदराबाद

दुसरा सामना – 5 मार्च, नागपूर

तिसरा सामना – 8 मार्च, रांची

चौथा सामना – 10 मार्च, मोहाली

पाचवा सामना – 13 मार्च, दिल्ली

दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय संघ वन डे मालिका खेळणार आहे. पहिला सामना 12 जानेवारी, दुसरा सामना 15 जानेवारी आणि तिसरा सामना 18 जानेवारी रोजी खेळवण्यात येईल. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ लगेच न्यूझीलंडसाठी रवाना होईल. 23 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक

वन डे मालिका

23 जानेवारी – पहिला वन डे सामना

26 जानेवारी – दुसरा वन डे सामना

28 जानेवारी – तिसरा वन डे सामना

31 जेनवारी – चौथा वन डे सामना

3 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना

टी-20 मालिका

6 फेब्रुवारी – पहिला टी ट्वेण्टी सामना

8 फेब्रुवारी – दुसरा टी ट्वेण्टी सामना

10 फेब्रुवारी – तिसरा टी ट्वेण्टी सामना

संबंधित बातम्या 

आता ऑस्ट्रेलिया भारतात येणार, मालिकेचं वेळापत्रक जाहीर 

धोनीची टीप आणि कुलदीप यादवने बोल्टची विकेट घेतली 

IndvsNZ Live: भारताचा न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून विजय  

ICC चे सगळेच पुरस्कार विराटला, तीनही अवॉर्ड जिंकणारा एकमेव क्रिकेटर

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.