Virat Anushka : विराट अनुष्काचा रोमँटिक अंदाज, किस करताना फोटो शेअर!
भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहलीने (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्कासोबतचा (Anushka Sharma) एक रोमँटिक फोटो (Romantic Photo) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहलीने (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्कासोबतचा (Anushka Sharma) एक रोमँटिक फोटो (Romantic Photo) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काला किस (Kiss) करताना दिसून येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालतोय. तर विराट-अनुष्काचे चाहते दोघांच्याही केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत. (Virat Kohli Share Romantic Photo With Anushka Sharma over Viranushka Daughter two Month)
विराट अनुष्काला मुलगी होऊन गुरुवारी दोन महिने पूर्ण झाले. अगदी त्याच दिवशी विराटने अनुष्काला किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी उड्या घेत लाईक्स आणि कमेंट्सा पाऊस पाडला आहे.
विराट अनुष्काचा रोमँटिंक अंदाज
विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर अनुष्काच्या माथ्यावर किस करत असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचीही केमिस्ट्री अगदी लाजवाब दिसत आहे. तसंच त्यांच्यातली बॉन्डिंग किती पक्की आहे, हे ही या फोटोमधून जाणवत आहे. तसं पाहायला गेलं तर विराटने हा फोटो अगदी टायमिंग साधून शेअर केला आहे. अनुष्काने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्यांच्या मुलीला दोन महिने पूर्ण होत असल्याची पोस्ट केली. त्यानंतर विराटने हा रोमँटिक अंदाजातला फोटो पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
केक कटिंग, आनंद द्विगुणित आणि बरंच काही…
मुलीच्या जन्माचे दोन महिने साजरे करताना विराट-अनुष्काने केक कापला. हा केक कापत त्यांनी आपल्या मुलीच्या जन्माला दोन महिने झाल्याचा आनंद द्विगुणित केला. अनुष्कानेही इन्स्टा पोस्ट करत ‘दोन महिने कसे गेले अगदी कळदेखील नाही’, अशा आशयाची पोस्ट करताना ‘खुशी खुशी निकल गये, असं म्हटलं.
महिलादिनी विराटची अनुष्कासाठी खास पोस्ट
महिलादिनी प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातीस महिलांसाठी दोन शब्द प्रेमाचे लिहित असतो किंवा बोलत असतो. विराटही यामध्ये पाठीमागे नव्हता. त्यानेही आपल्या पत्नीच्या कौतुकासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. या पोस्टमधून त्याने अनुष्काची तारीफ केली.
आईने बाळाला जन्म देणं किंबहुना एका बाळाचा जन्म होताना बघणं हे खूप आनंददायी आहे. याचा अनुभव आपण घेऊ शकता. हा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला महिलांची खरी ताकद आणि दिव्यता काय असते, हे कळेल. त्याबरोबर हे देखील कळेल की देवाने त्यांना एका आयुष्याला जन्म देण्याची संधी का दिली असेल? कारण पुरुषांपेक्षा जास्त महिला ताकदवान असतात, अशा आशयाची पोस्ट लिहित विराटने अनुष्कावर स्तुतीसुमने उधळली होती.
(Virat Kohli Share Romantic Photo With Anushka Sharma over Viranushka Daughter two Month)
हे ही वाचा :