Video: विराट कोहलीला वाटलं उस्मान ख्वाजाला हिंदी कळत नाही, पण झालं की…!
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना दिल्लीत सुरु असून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 263 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं आहे. दुसरीकडे पहिल्या डावात मैदानात काही मजेदार किस्सेही घडले.
दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानात सुरु आहेत. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात घुसलेला चाहता, त्यानंतर मोहम्मद शमीने टाकलेला नो बॉल चर्चेचा विषय ठरला.असं असताना उस्मान ख्वाजानं मैदानात चांगलाच तग धरलेला. त्याला बाद करण्यासाठी गोलंदाज प्रयत्न करत होते. तसेच फिल्डवरील क्षेत्ररक्षकही आपली स्ट्रॅटर्जी गोलंदाजांना सांगत होते. विराट कोहली तर आर. अश्विनला हिंदीत वारंवार उस्मान ख्वाजाच्या बॅटिंगबाबत सांगत होता. पण त्याची ही खेळी ख्वाजाने ओळखली आणि मैदानात एक हस्यकल्लोळ झाला. संघाचं 29 वं षटक रोहित शर्मानं आर. अश्विनला सोपवलं. त्यानंतर विराट कोहली स्लीपवरून अश्विनला माहिती सांगत होता. पण त्याची भाषा ख्वाजानं जाणली आणि दोघंही हसू लागले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. मोहम्मद शमीनं 4, रविंद्रन अश्विननं 3 आणि रविंद्र जडेजानं 3 गडी बाद केले.
उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटीत स्वस्तात बाद झाला होता. मात्र दिल्ली कसोटीत त्याने दमदार पुनरागमन केलं. 125 चेंडूत 81 धावांची खेळी केली. ख्वाजा सेट झाल्याने त्याला बाद करण्याचं मोठ आव्हान गोलंदाजांसमोर होतं. अखेर रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजा बाद होत तंबूत परतला.
Hindi samjh gya wo pic.twitter.com/8q7zrfSjDC
— Saddam Ali (@SaddamAli7786) February 17, 2023
ऑस्ट्रेलियाचा डाव
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा जोडीनं पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर बाद झाला त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजा आणि मार्नस लाबुसचेन जोडीनं 41 धावांची भागीदारी केली. मार्नसला बाद करण्यात अश्विनला यश आलं. स्मिथ तर आपलं खातंही खोलू शकला नाही. ट्रेविड हेड 12 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 81 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याला तंबूत धाडलं. अलेक्स करे मैदानात आला तसाच परत गेला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन (6) धावा करत बाद झाले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित
भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खूपच महत्त्वाची आहे. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकल्यास अंतिम सामन्याची वाट मोकळी होईल. भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकत भारताला मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप घट्ट पकड मिळवण्याची संधी आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.