Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

Virat Kohli captaincy | टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे.

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!
virat kohli
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 6:33 PM

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन (Virat Kohli captaincy) पायउतार होणार आहे. विराट कोहलीने (virat kohli) सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. (virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup will remain captain for odi and test)

सपोर्ट केलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहली कर्णधारपद सोडताना म्हणाला.

स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे

“वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसंच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही बॅटसमन म्हणून देत राहील,” असंही कोहलीने म्हटलं आहे.

भारतीय टीमची सेवा करत राहीन

“अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित सुद्धा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी 20 विश्वचषकानंतर टी 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली,” असे कोहलीने स्पष्ट केले. तसेच यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन, असे कोहलीने सांगितले.

कोहलीचं करिअर

विराट कोहलीने भारताकडून 65 कसोटी, 95 वन डे आणि 45 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 38 कसोटींमध्ये विजय मिळवला, 65 वन डे जिंकले, तर 29 टी 20 सामने आपल्या नावे केले.

रोहित शर्माकडे टी 20 चं कर्णधारपद?

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या :

T20 वर्ल्डकपमधून काढल्यानंतर या भारतीय गोलंदाजाची कामगिरी सुधारली, आता म्हणतो, जुना युजी परतला!

राजस्थान रॉयल्सला मिळाला 38 सिक्सर ठोकणारा धुरंधर, IPL 2021 मध्ये आता तुफान येणार!

शार्दुल ठाकूरची बँटिंग इतकी कशी सुधारली, टीम इंडियातील दोन शिलेदारांची मदत, वाचा इनसाईड स्टोरी

(virat kohli to step down as indian t20 captain after t20 world cup will remain captain for odi and test)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.