IND VS ENG : विराट कोहली पुन्हा अपयशी, दुसऱ्या डावातही अवघ्या 20 रन्सवर बाद

भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला. ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. बुमराहने 16 चेंडूत नाबाद 31 धावांची विक्रमी खेळीही खेळली. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 100 धावांचा टप्पा ओलांडला.

IND VS ENG : विराट कोहली पुन्हा अपयशी, दुसऱ्या डावातही अवघ्या 20 रन्सवर बाद
विराट कोहली पुन्हा अपयशी, दुसऱ्या डावातही अवघ्या 20 रन्सवर बादImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:53 PM

दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या 20 धावा करून बाद (Out) झाला आणि पुन्हा एकदा मोठी धावसंख्या (Runs) उभारण्यात अपयशी ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा चेंडू विराटच्या बॅटच्या काठावर आदळला आणि यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सच्या ग्लोव्हजला लागून चेंडू जो रूटच्या हातापर्यंत गेला. या पाचव्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 106 आणि सॅम बिलिंग्सने 36 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन खेळाडूंना बाद केले.

पहिला डाव 416 धावांवर आटोपला

भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला. ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. बुमराहने 16 चेंडूत नाबाद 31 धावांची विक्रमी खेळीही खेळली. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 100 धावांचा टप्पा ओलांडला. सुरुवातीच्या तीन धक्क्यांनंतर टीम इंडियाची धावसंख्या पुढे नेण्याची जबाबदारी चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आली. भारताची आघाडी 235 धावांवर पोहोचली आहे. अशा स्थितीत शक्य तितकी कामगिरी करावी हे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.

सामना सुरु कोहली आणि बेअरस्टो यांच्यात वाद

इंग्लंडच्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात मैदानावरच वादावादी झाली होती. विराट कोहलीने काय करायचे ते मला सांगू नकोस, तोंड बंद करून बॅट कर, असे बेअरस्टोला म्हणाला. यानंतर पंचांना हस्तक्षेप करुन वाद मिटवला. त्यानंतर ब्रेकमध्ये दोघेही एकमेकांशी हसत गप्पा मारताना दिसले. मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात काही संवाद झाला. जॉनी बेअरस्टोकडून एक बॉल बीट झाला होता, त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टो संतापला आणि विराटवर ओरडू लागला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Virat Kohli was out with 20 runs in the second innings)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.