Virat Kohli : तो पुन्हा येईल… सुनील गावस्करांच्या सल्ल्यानंतर भडकले विराट कोहलीचे कोच
पर्थ कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक तर ठोकलं पण ॲडलेड आणि गाबा कसोटी सामन्यात तो एकाच पद्धतीने आऊट झाला, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोहलीचा हा प्रॉब्लेम तांत्रिक नव्हे तर मानसिक आहे, असे अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. विख्यात क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी तर विराटला सचिनसारखं खेळण्याचा सल्ला दिला. मात्र त्यामुळे विराटचे कोच राजकुमार संतापले आहेत.
विख्यात भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने पर्थ येथील कसोटी सामन्यात शानदार शतक झळकवल. पण ॲडलेड आणि गाबा कसोटीमध्ये त्याची बॅट फार तळपली नाही, तो एकचा पद्धतीने आऊट होताना दिसतोय, त्यानंतर नामवंत क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्याला या समस्येतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी दिलेला हा सल्ला विराटचे ( लहानपणापासूनचे) कोच राजकुमार शर्मा यांना फारसा आवडला नसून त्यांनी थेट त्या दिग्दर क्रिकेटरवरच निशाणा साधला. सनील गावस्कर यांनी दिलेल्या सल्ला राजकुमार शर्मा यांना रुचला नसून त्यांनी तो थेट फेटाळून लावला. सुनील गावस्कर यांचा तो सल्ला काय होता? राजकुमार शर्मा का भडकले?, जाणून घेऊया.
गावस्करांचा सल्ला, विराटचे कोच संतापले
सध्या धावा करण्यासाठी धडपडणाऱ्या विराट कोहली याने सचिनची ऐतिहासिक खेळी पाहावी, असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला. सचिनने सिडनीमध्ये 241 धावा केल्या होत्या ज्यात त्याने एकही कव्हर ड्राईव्ह मारला नाही, असे त्यांनी सांगितलं. मात्र विराटटचे कोच, राजकुमार शर्मा मात्र यामुळे अजिबात खूश नाहीत. गावस्कर हे महान खेळाडू आहेत, मात्र ते इतर खेळाडूंनाही फलंदाजीसाठी सल्ला देतील अशी अपेक्षा शर्मा यांनी व्यक्त केली, ‘ विराट हा 2008 पासून उत्तम खेळतोय. फक्ते दोन सामन्यांमधील त्याच्या कामगिरीमुळे तो फॉर्ममध्ये नाही असं म्हणणं योग्य नाही. या सीरिजमध्ये विराटने आधी शतक झळकावलं आह, इतर कोणत्या खेळाडूंनी ही ( शसतक झळकावण्याची) कामगिरी केली आहे ?’ असा खडा सावला राजकुमार शर्मा यांनी उपस्थित केला.
तो पुन्हा देईल चोख उत्तर
विराटच्या आकडेवारीबद्दल मला माहिती नाही पण तो नक्की पुनरागमन करेल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. विराट हा एक उत्तम खेळाडू आहे, त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही, असेही शर्मा म्हणाले. त्यांच्या मते, विराट कोहलीच्या मनात किंवा तंत्रात कोणतीही अडचण नाही, तो त्याचा खेळ चांगल्या प्रकारे समजतो. विराटशी माझं बोलणं झालंय, पण त्याचे तपशील जाहीर करण्यात त्यांना रस नाही. तो कुठे चुकतोय हे विराटला माहीत आहे, आणि तो नक्कीच नुरगामन करेल, तो पुन्हा येईल असे शर्मा यांनी नमूद केलं.
आपल्या शिष्याचा बचाव करताना राजकुमार शर्मा म्हणाले की, गेल्या 3 वर्षापांसून त्याचे ( कामगिरीचे) आकडे चांगले नाहीत. विराटला आता सातत्याने धावा करता येत नाहीत आणि मोठी गोष्ट म्हणजे ऑफ स्टंपचे चेंडू सोडण्याऐवजी तो सतत त्यांच्याशी छेडछाड करत आहे. विराटलाही हे माहीत आहे, त्यामुळेच गॅबा कसोटीच्या पहिल्या डावात बाद झाल्यानंतर तो थेट नेटवर गेला आणि तिथे त्याने त्याच्या कमजोरीवर काम केलं. आगामी डावात विराट टीकाकारांना उत्तर देईल अशी अपेक्षा आहे, असे राजकुमार शर्मा म्हणाले.