… तर मला घरी बसावं लागेल, विराटचं गौतम गंभीरला उत्तर

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या वक्तव्याला उत्तर दिलंय. गंभीर म्हणाला होता, की विराट हा रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखा चलाख कर्णधार नाही. यावर विराट म्हणाला, जर मी असा विचार केला तर मला घरी बसावं लागेल. नक्कीच तुम्हाला आयपीएल जिंकायचं असतं आणि मी तेच करतोय, ज्याची माझ्याकडून […]

... तर मला घरी बसावं लागेल, विराटचं गौतम गंभीरला उत्तर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या वक्तव्याला उत्तर दिलंय. गंभीर म्हणाला होता, की विराट हा रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखा चलाख कर्णधार नाही. यावर विराट म्हणाला, जर मी असा विचार केला तर मला घरी बसावं लागेल.

नक्कीच तुम्हाला आयपीएल जिंकायचं असतं आणि मी तेच करतोय, ज्याची माझ्याकडून अपेक्षा केली जाते. मी आयपीएल जिंकलो किंवा नाही जिंकल्यामुळे माझ्यावर जी टीका केली जाते, त्याची मी चिंता करत नाही. तुम्ही कोणत्याही मर्यादा निश्चित करु शकत नाही. मी माझ्यावतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मलाही आयपीएल जिंकावं वाटतं, पण कधी कधी असं होऊ शकतं, असं विराट म्हणाला.

विराटला गंभीरच्या टिप्पणीवर प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला, आपल्याला या बाबतीत व्यावहारिक व्हायला हवं. दबावात निर्णय घ्यावे लागल्यामुळे असं झालं. जर मी बाहेर बसलेल्या लोकांसारखा विचार केला तर मी पाच सामनेही जिंकू शकत नाही आणि मी आतापर्यंत घरी बसलो असतो, असं विराट म्हणाला.

गंभीर काय म्हणाला होता?

विराट कोहली हा चलाख कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीसोबत केली जाऊ शकत नाही. धोनी आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन-तीन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय, असं गंभीर म्हणाला होता.

कोहली नशिबवान आहे, की टीमला गेल्या आठ वर्षात एकदाही कर्णधार म्हणून आयपीएल न जिंकवून देताही तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत अजून खेळतोय. मी त्याला एक चलाख कर्णधार म्हणून पाहत नाही, मी त्याला एक धोरणात्मक कर्णधार म्हणूनही पाहत नाही. त्याने एकदाही आयपीएल मालिका जिंकली नाही. एक कर्णधार तेवढाच चांगला असतो, जेवढा त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, असं गंभीर म्हणाला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.