Asia Cup : विराटची बॅट तळपली, मलाच विश्रांती घ्यावी लागेल..! केएल राहूलच्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या..!
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली हे सलामीला आले होते. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हे दोघे सलामीला आले होते. भारताने हा सामना 101 धावांनी जिंकल्यानंतर राहुलला सलामीला फलंदाजी कोण करणार यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.
दुबई : भलेही टी-20 अशिया कपमधील (Indian Team) भारतीय टीमचे आव्हान संपुष्टात आले असले तरी अफगाणिस्तान बरोबर झालेल्या सामन्यामुळे टीमचा आत्मविश्वास तर वाढला आहे. शिवाय गेल्या काही वर्षापासून फार्म गमावलेला विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. (Virat Kohli) विराटने या सामन्यात 61 चेंडूमध्ये तब्बल 122 धावा ठोकल्या. त्याला सूर गवसला असला तरी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल कर्णधार केएल राहुलला विचारले असता त्यांने मजेशीर उत्तर दिले आहे. विराटची बॅटींग पाहता आता (T20) टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला सलामीला पाठवले जाणार का ? असे विचारले असता, क्षणाचाही विलंब न लावता केएल राहुलने दिलेल्या उत्तराने सर्वच अचंबित झाले. तो सलामीला म्हणल्यावर मी बाहेर बसू का? असे उत्तर त्याने दिले.
म्हणून विराट कोहली सलामीला आला..
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली हे सलामीला आले होते. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हे दोघे सलामीला आले होते. भारताने हा सामना 101 धावांनी जिंकल्यानंतर राहुलला सलामीला फलंदाजी कोण करणार यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.
एक खेळी अन् वातावरण टाईट
गेल्या काही दिवसांपासून माजी कर्णधार विराट कोहली याला सूर सापडत नव्हता. पण अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यान विराटने अशी काय खेळी केली की, त्यामुळे सर्व चित्रच बदलून गेले आहे. त्याने या सामन्यात 61 चेंडूमध्ये 122 धावा ठोकल्या होत्या. 1 हजार 27 दिवसानंतर त्याने ही दमदार फलंदाजी केली आहे. आगामी काळात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अनुषंगाने त्याचा फॉर्म परत येणे गरजेचे होते.
काय म्हणाला केएल राहुल?
अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला गवसलेला सूर हा टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. यातच आगामी काळात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. पण विराट कोहली हा सलामीला आल्यावरच शतक ठोकू शकतो असे काही नाही. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली तरी तो असा चमत्कार करू शकतो. त्यामुळे तो सलामीलाच येईल असेही काही नसल्याचे केएल राहुलने सांगितले आहे.