“मी 199 या धावसंख्येवर खेळत होतो, तेव्हा ईशांत आला आणि…”, सेहवागने सेल्फिशची व्याख्या केली स्पष्ट
विरेंद्र सेहवागने कसोटीत दोन त्रिशतक झळकावलं आहे. त्याचबरोबर काही खेळी कायम स्मरणात राहणाऱ्या आहे. यापैकी एक म्हणजे श्रीलंकेविरुद्ध 2008 मध्ये खेळलेली नाबाद 201 धावांची खेळी...
मुंबई : क्रिकेट, क्रिकेटपटू आणि त्यांचे किस्से बरंच काही सांगून जातं. प्रेक्षक गॅलरीतून किंवा टीव्हीवर सामना बघताना आपल्याला अनेक गोष्टी कळत नाही. पण कालांतराने नेमकं तेव्हा काय घडलं? याबाबतचा खुलासा केला की आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक किस्सा विरेंद्र सेहवाने सांगितलं आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2008 साली झालेल्या कसोटी सामन्याती हा प्रकार आहे. विरेंद्र सेहवाने या सामन्यात 201 धावा केल्या होत्या. तर संपूर्ण भारतीय संघ 329 या धावांवर बाद झाला होता.
मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत सेहवाग 201 धावा करून नाबाद राहिला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. या सामन्यात अजंता मेडिंस आणि मुथय्या मुरलीधरनने चांगली गोलंदाजी करत 15 गडी बाद केले होते. या सामन्यात बाबत बोलताना सेहवागने सांगितलं की, “जर ईशांत शर्माने त्याच्याकडे बॅटिंगसाठी आग्रह केला नसता तर मी आणखी धावा केल्या असत्या.”
धावा करताना स्वार्थी असल्याची प्रश्न करताच सेहवागने सांगितलं की, “नकारात्मक वातावरण म्हणजे काही जण धावा करणं पसंत करतात. पण समोरच्याला अयशस्वी बघणं देखील आवडत असतं. मी कायम माझ्या जोडीदारासोबत धावा करण्याचा प्रयत्न केला आहे. जो चांगला असेल त्याला निवडलं जाईल. मी स्वार्थी का होऊ?”
विरेंद्र सेहवाग यावेळी किस्सा सांगताना म्हणाला, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी 199 या धावसंख्येवर खेळत होतो. ईशांत शर्मा माझा पार्टनर होता. मला माहित होतं की, ईशांत मुरलीधरन आणि मेंडिसला खेळू शकत नाही. तेव्हा मी स्वार्थीपण केला असता. दोन धावा करून ईशांतला स्ट्राईक देऊ शकलो असतो.”
“मी मुरलीधरनचे पाच चेंडू खेळलो आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. तेव्हा ईशांत माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी खेळू शकतो. तू विनाकारण घाबरत आहेस. मी सांगितलं ठिक आहे. मी एक सिंगल रन घेऊन 200 पूर्ण केले आणि त्याला स्ट्राईक दिली. ईशांत दोन चेंडूतच तंबूत परतला. मी त्याला सांगितलं तु त्याला खेळलास, पूर्ण झाली इच्छा?”, असं सेहवागने सांगितलं.
“माझ्या डोक्यात संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची विचार सुरु होता. माझ्यासाठी 200 धावा महत्त्वाच्या नव्हत्या. माझा विचार होता की स्ट्राईकवर राहावं आणि टीमसाठी धावा कराव्यात. तो माझा स्वार्थ नव्हता.”, असंही विरेंद्र सेहवागने पुढे सांगितलं.
विरेंद्र सेहवाग भारतासाठी 104 कसोटी आणि 251 वनडे सामने खेळला आहे. त्याचबरोबर 19 टी 20 सामनेदेखील खेळला आहे.टी 20 विश्वचषक (2007) आणि एकदिवसीय विश्वचषक (2011) मध्ये विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.