इंग्लंडचा तिन्ही मालिकेत पराभव, सेहवाग म्हणतो, ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे!’
खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे, अशी टिप्पणी करत सेहवागने इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे. Virendra Sehwag
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्याक काँटे की टक्कर पाहायला मिळाली. या मॅचमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला 7 रन्सने पराभूत करुन एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. त्याअगोदर भारताने कसोटी आणि टी ट्वेन्टी मालिकाही जिंकली होती. म्हणजेच विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील संघाने कसोटी, टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय या तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडला धूळ चारली. इंग्लंडच्या याच पराभवावरुन भारताचा आक्रमक दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) इंग्लंडची खिल्ली उडवली आहे. खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे, अशी टिप्पणी करत सेहवागने इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे. (Virendra Sehwag Troll England team After India beaten test ODI And T20)
खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे!
सॅम करनजवळ (Sam Curran) टॅलेंट आहे. त्याने अखेरच्या सामना जवळजवळ इंग्लंडला जिंकून दिला होता. परंतु भारताने बाजी मारली. शेवटी खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे, असं ट्विट वीरेंद्र सेहवागने केलं आहे.
Sam Curran is some talent and he nearly pulled it off for England. But in the end, Khaali haath aaye thhey, khaali haath jaayenge England waale. Good win for Team India but across formats this has been a well fought series. #INDvsENG pic.twitter.com/haA3krhgHw
— Virender Sehwag (@virendersehwag) March 28, 2021
सॅम करनची झुंझार खेळी
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने (Sam Curran) जवळपास भारताचा विजय खेचून आणला होता. सॅक करनने एकाकी झुंज दिली. त्यामुळेच 330 धावांचं भलंमोठं लक्ष्य देऊनही भारताला (India vs England 3rd Odi) हा सामना केवळ 7 धावांनीच जिंकता आला. या सामन्यात सॅम करनने सर्वांचे श्वास रोखले होते. सॅम मैदानात आला तोपर्यंत इंग्लंडने मॅच गमावल्याचीच स्थिती होती. मात्र सॅमने 83 चेंडूत 95 धावांची जबरदस्त खेळी करुन, भारताच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. सॅम करन शेवटपर्यंत नाबाद राहिला, मात्र तो इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही.
भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये चॅम्पियन
भारताने इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये पराभवाचं तोंड पाहायला लावलं. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 3-1 अशी मालिका जिंकली. 5 सामन्यांची टी ट्वेन्टी मालिका भारताने 3-2 अशी जिंकली. तर अखेरच्या निर्णायक मॅचमध्ये इंग्लंडचा 7 धावांनी पराभूत करत एकदिवसीय मालिका देखील खिशात घातली. विराटच्या नेतृत्वाखालील टीमने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं.
(Virendra Sehwag Troll England team After India beaten test ODI And T20)
हे ही वाचा :
IPL 2021 : RCB चे दिग्गज चेन्नईला जमायला सुुरुवात, विराट या दिवशी कॅम्पसाठी रवाना होणार!