David Warner : अर्धशतक ठोकताच वॉर्नरने केले ‘शतक’, पोहोचला गेलच्या जवळ, जाणून घ्या कसे
वेस्टइंडिज विरोधात चांगली फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर सद्या चांगल्या फॉर्ममध्ये असून घरच्या मैदानावर विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) फलंदाज डेव्हिड वॉनर (David Warner) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा अर्धशतक केलं, त्यानंतर त्याने जलद शतक केलं आहे. त्याच्याकडून विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत चांगली कामगिरी होईल.
वेस्टइंडिज विरोधात चांगली फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर सद्या चांगल्या फॉर्ममध्ये असून घरच्या मैदानावर विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. वॉर्नरने आत्तापर्यंत 100 वेळा 50 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. त्यामुळे तो सर्वाधित धावा काढण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल एक नंबरला आहे. त्याने 110 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. खूप दिवसांपासून ख्रिस गेल एक नंबरला आहे.
तिसऱ्या क्रमांकाला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. त्याने 87 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. येत्या विश्वचषक स्पर्धेत विराट चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा आहे.