Champions Trophy 2025: विराट कोहलीमुळे गौतम गंभीर निराश ? चर्चांना उधाण, कोच म्हणाले…
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीचे शतक हुकले, पण त्याने 84 धावांची उत्तम खेळी केली. खरंतर विराट कोहली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो बराच निराश दिसला. आता भारतीय संघाचे कोच

Gautam Gambhir On Virat Kohli: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनमल मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायलनमध्ये ध़डक मारली. अव्वल क्रिकेटपटून विराट कोहली याने विजयातच सिंहाचा वाटा बजावला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना ओपनिंगला आलेले कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले, पण विराट कोहलीने टिकून रहात शानदार खेळी केली आणि भारताला विजयाच्या समीप पोहोचवले. या सामन्यात विराट कोहलीचे शतक हुकले, पण त्याने 84 धावांची चांगली खेळी केली. खरंतर विराट कोहली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी बोलत असल्याचे दिसले. यादरम्यान गौतम गंभीर निराश झालेला दिसला. विराटने उत्तम खेळश करूनही त्याचे शतक हुकल्याने गौतम गंभीर निराश होता.
काय म्हणाला गौतम गंभीर ?
त्यावेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात काय संवाद झाला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने पत्रकार परिषदेत विराट कोहलीचे कौतुक केले. गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहली एक महान एकदिवसीय क्रिकेटपटू आहे. डाव कसा वाढवायचा हे त्यावा व्यवस्थित माहित आहे, मग तुम्ही लक्ष्य सेट करत असाल किंवा धावांचा पाठलाग करत असाल तरी विराट कोहली परिस्थितीशी झटपट जुळवून घेतो. अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा असते.विराट कोहली या फॉरमॅटमध्ये अप्रतिम आहे अशा शब्दांत गंभीरने त्याचं कौतुक केलं.
फायनलमध्ये न्युझीलंडशी पुन्हा होणार भारताचा सामना
येत्या रविवारी भारत आणि न्यूझीलंडचे संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला. तर सेमीफायनलमध्येही विजयी खएळी टीम इंडियाने कायम ठेवली. त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये थेट धडक मारली.