वॉशिंग्टन सुंदरचे वडील इशांत आणि सिराजवर संतापले, मुलाचं शतक अधुरं राहिल्याने नाराज
वॉशिंगटन सुंदरने (washington sundar) अहमदाबादमधील चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात 96 धावांवर नाबाद राहिला. तर याच मालिकेत त्याने 85 धावांनी नाबाद खेळी केली.
मुंबई : “मी टीम इंडियाच्या शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या कामगरीबाबत फार नाराज आहे. हे फलंदाज अवघ्या मिनिटभरही मैदानात टिकू शकले नाहीत. समजा टीम इंडियाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल, तेव्हा हे फलंदाज असेच बाद झाले, तर ही मोठी चूक नसेल का”, असा संतप्त सवाल भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम सुंदर यांनी उपस्थित केला आहे. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज झटपट बाद झाल्याने सुंदरला पहिल्या वहिल्या कसोटी शतकापासून वंचित रहावे लागले. या दोघांमुळे आपल्या मुलाचं शतक अधुर राहिल्याचं संताप सुंदरच्या वडिलांना अनावर झाला. त्यांनी इशांत आणि सिराजला खरीखोटी सुनावली. (washington sundar missed her century father M Sundar was unhappy for Ishant Sharma and Mohammad Siraj)
काय म्हणाले सुंदरचे वडील?
“इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी देशातील लाखो तरुणांनी पाहिली असेल. या तरुणांनी इशांत आणि सिराजच्या खेळीतून काय बोध घेतला असेल, असा प्रश्न सुंदरच्या वडिलांनी उपस्थित केला. तसेच या दोघांनी जी चुकी केली, ती चूक भावी क्रिकेटपटूंनी करु नये”, असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला. सुंदरचे वडिल एका वृत्त संस्थेशी संवाद साधत होते. त्यावेळस त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.
दोघांनी धैर्य दाखवलं नाही
“इशांत आणि सिराज या दोघांनी मैदानात उभं राहण्याचं साहस दाखवलं नाही. या दोघांनी सहज विकेट गमावली. मैदानात तग धरणं फार मोठी गोष्टी नाही. त्यासाठी तुमच्याकडे धैर्य हवं. इंग्लंडचे गोलंदाज शारिरकदृष्ट्या थकले होते. बेन स्टोक्स 123-126 च्या वेगाने गोलंदाजी करत होता. तो फार आक्रमकपणे बोलिंग टाकत नव्हता”, असंही एम सुंदर यांनी स्पष्ट केलं.
नक्की काय झालं?
सुंदर आणि अक्षर पटेलने चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. 7 बाद 294 धावसंख्येवरुन खेळाची सुरुवात झाली. वॉशिंग्टन सुंदर (60*) आणि अक्षर पटेल (11*) धावांवर नाबाद होते. सुंदरला शतक तर अक्षरला अर्धशतकाची संधी होती. दोघांनी झोकात सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकी गोलंजदाज जॅक लीचच्या बोलिंगवर जोरदार फटकेबाजी केली. या दरम्यान दोघांमध्ये 106 धावांची शतकी भागीदारी झाली. दोघेही चांगले सेट झाले होते. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात अक्षर 43 धावांवर रनआऊट झाला. अक्षरच्या रुपात भारताला 8 वा धक्का बसला. अक्षर बाद झाला तेव्हा सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होता.
अक्षरनंतर इशातं शर्मा मैदानात आला इशांत आला तसाच बाहेर गेला. इशातंला बेन स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर आऊट केलं. इशांतच्या रुपात टीम इंडियाने नववी विकेट गमाववली. त्यानंतर मोहम्मद सिराज मैदानात आला. सिराजने 2 चेंडूंचा सामना केला. सिराज सुंदरला स्ट्राईक मिळवून देणार असं वाटत होतं. पण तेव्हाच स्टोक्सने आपल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बोल्ड केलं. सिराज आऊट झाल्याने टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला. सिराजच्या बाद झाल्याने नॉन स्ट्राईकर एंडवर असेलला सुंदर आपल्या शतकापासून 4 धावांनी वंचित राहिला. सुंदर 96 नाबाद धावांवर माघारी परतला. अशाप्रकारे सुंदर आपल्या कसोटीतील पहिल्या शतकापासून 4 धावांपासून दुर राहिला.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत सुंदर दुसऱ्यांदा अनलकी
सुंदरच्या वडीलांनी संताप व्यक्त करणं स्वाभाविक आहे. कारण सोबतच्या फलंदाजांने सुंदरला साथ न दिल्याने सुंदर दुसऱ्यांदा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत शतकापासून दूर राहिला. याआधी चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत सुंदरला शतकी खेळी करण्याची संधी होती. पण इतर सहकाऱ्यांनी त्याला साथ न दिल्याने त्याला शतकापासून वंचित राहावे लागले. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्याने सुंदर 85 रन्सवर नॉट ऑऊट राहिला होता. सुंदरने 138 चेंडूत 2 सिक्स आणि 12 चौकारांसह नाबाद 85 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Video | सिराज आऊट झाला अन् सुंदरचं शतक हुकलं, मग सुंदरनं काय केलं? पाहा ‘हा’ व्हिडीओ
(washington sundar missed her century father M Sundar was unhappy for Ishant Sharma and Mohammad Siraj)