Wasim Akram Birthday: वसीम अकरमच्या आक्रमक गोलंदाजीची दहशत होती, जाणून घ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्द
Wasim Akram : जगातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक वसीम अक्रम आज 56 वर्षांचा झाला आहे. वसीम अकरमने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 916 विकेट घेतल्या.
नवी दिल्ली – जगभरात प्रत्येक क्रिकेटरचे एक वेगळे स्थान आहे. त्याचबरोबर त्यांचे चाहते देखील आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Wasim Akram) याचं सुध्दा वेगळं स्थान आहे. जगात त्याचे चाहते आहेत. आजही वसीम आक्रमचे चाहते त्याच्या खेळाची आणि हेअर स्टाईलची आठवण काढताना पाहायला मिळतात. पाकिस्थानचे अनेक खेळाडू त्यांच्या हेअर स्टाईलसाठी फेमस आहेत. परंतु वसीम अकरमची स्टाईल आणि खेळी इतकी आक्रमक होती की, त्याचे व्हिडीओ आजही चाहते पाहत असतात. आज वसीम आक्रमचा वाढदिवस आहे. वसीमचं करीअर एकाद्या फिल्मी स्टोरी सारखं आहे. गोलंदाज म्हणून पाकिस्तान (Pakistan) संघात स्थान मिळवल्यानंतर त्याने काळी काळ संघाचं कॅप्टन पद देखील संभाळलं होतं. त्यानंतर तो कॉमेट्री (Commentary) करताना देखील दिसला होता. त्यांच्या पत्नीनं देखील त्याला चांगली साथ दिली आहे.
पाकिस्तानसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज
जगातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक वसीम अक्रम आज 56 वर्षांचा झाला आहे. वसीम अकरमने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 916 विकेट घेतल्या. तो अजूनही पाकिस्तानसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज आहे. मधुमेहामुळे वयाच्या 30 व्या वर्षी त्याला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले होते. पण तरीही त्याने हार मानली नाही, आपली आवड आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर आपली कारकीर्द वाढवली.
संपूर्ण जग त्याच्या गोलंदाजीला घाबरू लागले
कोणत्याही देशाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी त्या देशाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. परंतु अकरमने एकही प्रथम श्रेणी आणि सामना न खेळता संघात स्थान मिळवले होते. संधी मिळाल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी छाप सोडली की संपूर्ण जग त्याच्या गोलंदाजीला घाबरू लागले. अकरमला संघात घेण्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांचा मोलाचा वाटा होता. पण त्याची दिवंगत पत्नी हुमा हिनेही त्याच्या कारकिर्दीला योग्य साथ दिली. ही गोष्ट स्वत: जावेद मियांदादने सांगितली आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 916 विकेट्स
अकरमच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर त्याने 104 कसोटी, 356 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 414 बळी घेतले ज्यात 25 वेळा 5 बळींचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 502 विकेट घेतल्या आहेत.
याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 1042 विकेट घेतल्या आहेत.