वसीम अक्रमची भविष्यवाणी, या टीम T20 World Cup उपांत्य फेरीत पोहोचतील
आशिया चषकमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. तसेच टीम इडियाने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) नेहमी एखाद्या विषयावर बोलत असतो. त्याने आता कोणती टीम सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकते हे सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) येत्या रविवारपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. अनेक टीम आपले सराव सामने सध्या तिथं खेळत आहेत. विशेष म्हणजे तिथं देशातल्या सोळा टीम दाखल झाल्यापासून सराव करीत आहेत.
वसीम अक्रमने आत्तापर्यंत अनेकदा आपल्या क्रिकेटच्या अनुभवावर भविष्यवाणी सांगितली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकते असं विधान आक्रमने खलिज टाईम्सकडे केलं आहे.
आशिया चषकमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. तसेच टीम इडियाने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. त्यामुळे दोन्ही टीम सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकतात.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्टी तेज गोलंदाजांना अधिक मदत करते, त्यामुळे पाकिस्तानची अधिक प्रभावी होईल असंही तो म्हणाला आहे.
आज टीम इंडियाचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाशी दुसरा सराव सामना होणार आहे.