57 शतकं, 19 हजार धावा, प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरचा क्रिकेटला अलविदा
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफरने (Wasim Jaffar announces retirement) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफरने (Wasim Jaffar announces retirement) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटमधील तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंपैकी एक असलेल्या वासिम जाफरने वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. ‘माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलांपैकी एकाने भारताचे प्रतिनिधीत्व करावे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.’ असं वासिम जाफरने म्हटलं. (Wasim Jaffar announces retirement)
42 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 57 शतकं झळकावली आहेत. 260 प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने तब्बल 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं ठोकली. नाबाद 314 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
Batsman Wasim Jaffar announces retirement from all forms of cricket, says ‘My father wanted one of his sons to represent India and I feel proud to have fulfilled his dream.’ pic.twitter.com/8vQ7qe9qkw
— ANI (@ANI) March 7, 2020
जाफर भारताकडून 31 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या आहेत. शिवाय दोन वन डे सामन्यातही जाफर भारताकडून खेळला आहे. वासिम जाफरने 2000 मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं. शेवटची कसोटी तो 2008 मध्ये खेळला.
Mat | Inns | NO | Runs | HS | Ave | BF | SR | 100 | 50 | 4s | 6s | Ct | St | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Tests | 31 | 58 | 1 | 1944 | 212 | 34.10 | 4045 | 48.05 | 5 | 11 | 272 | 3 | 27 | 0 |
ODIs | 2 | 2 | 0 | 10 | 10 | 5.00 | 23 | 43.47 | 0 | 0 | 2 | 0 | 0 | 0 |
First-class | 260 | 421 | 38 | 19410 | 314* | 50.67 | 57 | 91 | 299 | 0 | ||||
List A | 118 | 117 | 7 | 4849 | 178* | 44.08 | 10 | 33 | 45 | 0 | ||||
T20s | 23 | 23 | 1 | 616 | 95 | 28.00 | 477 | 129.14 | 0 | 6 | 75 | 11 | 11 | 0 |
दहा रणजी फायनल खेळाला, सर्व सामने जिंकले
गेल्या वर्षी विदर्भ संघाने रणजी चषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळी वासिम जाफर विदर्भकडून खेळला होता. नागपुरात विदर्भ संघाने जिंकलेली ही रणजी ट्रॉफी वसिम जाफरच्या कारकीर्दीतली दहावी ट्रॉफी ठरली. 42 वर्षी वसिम जाफरचा हा दहावा रणजी अंतिम सामना होता आणि या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आलं. त्याने 2015/16 पर्यंत मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तर गेल्या दोन मोसमांपासून तो विदर्भाकडून खेळतोय. विदर्भाने सलग दोनवेळा विजय मिळवला.
वसिम जाफरने या विक्रमासोबत सर्वाधिक वेळा चॅम्पियन होण्याचा मनोहर हर्दिकर आणि दिलीप सरदेसाई यांचा विक्रमही मोडला. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनीही प्रत्येकी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. या यादीत वसिम जाफरच्या पुढे अजित वाडेकर (11) आणि अशोक मंकड (12) यांचा क्रमांक लागतो.
वासिम जाफरची शतकं
- मुंबईकडून खेळताना – 36
- पश्चिम विभागाकडून खेळताना – 7
- विदर्भकडून खेळताना – 6
- भारताकडून खेळताना – 5
- इंडिया A -1
संबंधित बातम्या
वासिम जाफर कोचच्या भूमिकेत, बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी करार!